मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Abhidnya Bhave: प्रेग्नंट आहेस का? अभिज्ञा भावेच्या नव्या फोटोशूटवर नेटकऱ्यांच्या कमेंट

Abhidnya Bhave: प्रेग्नंट आहेस का? अभिज्ञा भावेच्या नव्या फोटोशूटवर नेटकऱ्यांच्या कमेंट

Aarti Vilas Borade HT Marathi
May 22, 2023 01:47 PM IST

Abhidnya Bhave: अभिज्ञाने पतीसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोवर नेटकऱ्यांनी कमेंट करत अभिज्ञाला प्रेग्नंट आहेस का? असा प्रश्न विचारला आहे.

Abhidnya Bhave
Abhidnya Bhave

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री अभिज्ञा भावे हिने आज प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. अनेक मालिकांमधून अभिज्ञा प्रेक्षकांच्या भेटीला आली. आपल्या अभिनयाने ती घराघरात पोहोचली. अभिज्ञाने जानेवारी २०२१ रोजी मेहुल पै सोबत लग्नगाठ बांधली. त्यांचा विवाह अत्यंत थाटामाटात पार पडला होता. आता अभिज्ञाने पतीसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो पाहून अनेकांनी तिला प्रेग्नंट आहेस का? असा प्रश्न विचारला आहे.

अभिज्ञा ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सतत चाहत्यांसोबत गप्पा मारताना दिसते. तिने नुकताच काळ्या रंगाचा वनपिस परिधान करुन काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अभिज्ञासोबत तिचा पती मेहूल देखील दिसत आहे. त्याने देखील काळ्या रंगाचा शर्ट घातला आहे. या लूकमध्ये दोघेही छान दिसत आहेत.

सध्या सोशल मीडियावर अभिज्ञाचा पतीसोबतचा हा फोटो व्हायरल झाला आहे. अनेकांनी तिच्या या फोटोवर कमेंट केल्या आहेत. एका यूजरने 'तू प्रेग्नंट आहेस का?' अशी कमेंट केली आहे. तर दुसऱ्या एका यूजरने “गुडन्यूज आहे का? तुझ्याकडे बघून असं वाटतं आहे” अशी कमेंट केली आहे. अभिज्ञाच्या या फोटोंवरुन सध्या तिच्या प्रेग्नंसीच्या चर्चा रंगल्या आहेत.

Comments
Comments (Abhidnya Social media)

या पोस्टवर अभिज्ञाचा पती मेहुल पै याने प्रतिक्रिया दिली आहे. मेहुलने यावर दोन इमोजी शेअर करत कमेंट केली आहे. या इमोजीवरुन तो आनंदी असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, अभिज्ञा गर्भवती आहे की नाही याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही.

IPL_Entry_Point

विभाग