मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  ज्येष्ठांचा आदर राखणं...; केतकी चितळे प्रकरणार आदेश बांदेकरांची प्रतिक्रिया

ज्येष्ठांचा आदर राखणं...; केतकी चितळे प्रकरणार आदेश बांदेकरांची प्रतिक्रिया

Aarti Vilas Borade HT Marathi
May 17, 2022 11:17 AM IST

केतकी चितळेने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी सोशल मीडियावर एक लिहिली होती.

केतकी चितळे
केतकी चितळे (HT)

अभिनेत्री केतकी चितळे (ketki chitle) हिने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार(sharad pawar) यांच्याविरोधात केलेल्या आक्षेपार्ह पोस्टनंतर तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. केतकीला १५ मे रोजी अटक करण्यात आली. कळंबोली पोलीस ठाण्यात तिची बराच वेळ चौकशी केल्यानंतर तिला न्यायालयात हजर करण्यात आले. याप्रकरणी अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. आता शिवसेना चित्रपट सेनेचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आदेश बांदेकर यांनी नुकताच एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी केतकी चितळे प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. “संस्कार आणि संस्कृती विसरून विधाने करणाऱ्यांबद्दल मला काहीच बोलायचे नाही. ज्येष्ठांचा आदर राखणे फार गरजेचे आहे आणि ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. त्यामुळे याविषयी मी काहीही बोलू इच्छित नाही,” असे आदेश बांदेकर यांनी म्हटले आहे.

काय होती केतकीची पोस्ट?

‘तुका म्हणे पवारा l नको उडवू तोंडाचा फवारा ll ऐंशी झाले आता उरक l वाट पहातो नरक...' अशी कविता केतकीने फेसबुकवरव शेअर केली होती. नितीन भावे नावाच्या व्यक्तीच्या नावाने लिहिलेली ही कविता तिने पोस्ट केली. ही आक्षेपार्ह पोस्ट पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला सोशल मीडियावर ट्रोल केले आहे.

IPL_Entry_Point