मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Rahul Gandhi : राहुल गांधी यांचा पुढील दौरा रद्द, ‘या’ कारणामुळे लातुरातच करावा लागला मुक्काम

Rahul Gandhi : राहुल गांधी यांचा पुढील दौरा रद्द, ‘या’ कारणामुळे लातुरातच करावा लागला मुक्काम

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Apr 25, 2024 12:13 AM IST

Rahul Gandhi In Latur : राहुल गांधी दिल्लीला प्रयाण करण्यासाठी लातूरला विमानतळावर दाखल झाले. तेथून ते दिल्लीकडे जाणार होते. मात्र संध्याकाळी लातूरमधून उड्डाणाची सोय नसल्याने त्यांना लातूरला मुक्काम करावा लागला.

राहुल गांधी यांचा पुढील दौरा रद्द
राहुल गांधी यांचा पुढील दौरा रद्द

Rahul Gandhi lok Sabha campaign : काँग्रेस नेते व खासदार राहुल गांधी (Congress leader Rahul Gandhi) लोकसभा निवडणूक प्रचारासाठी बुधवारी महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. राहुल गांधी यांनी बुधवारी अमरावतीचे काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखेडे आणि सोलापूर लोकसभेच्या काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्यासाठी प्रचार सभा घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप सरकारवर जोरदार टीका केली. अमरावतीनंतर राहुल गांधींची सोलापुरात सभा झाली. सोलापूरची सभा आटोपून राहुल गांधी दिल्लीकडे प्रयाण करणार होते. मात्र काही तांत्रिक कारणांमळे त्यांना आज लातुरातच मुक्काम करावा लागला.

ट्रेंडिंग न्यूज

सोलापूरची सभा आटोपून राहुल गांधी दिल्लीला प्रयाण करण्यासाठी लातूरला विमानतळावर दाखल झाले. तेथून ते दिल्लीकडे जाणार होते. मात्र संध्याकाळी लातूरमधून उड्डाणाची सोय नसल्याने त्यांना लातूरला मुक्काम करावा लागला. लातूर शहरातील ग्रँड हॉटेलमध्ये ते थांबले आहेत. राहुल गांधी लातूरमध्ये थांबणार असल्याचे समजताच ते थांबलेल्या हॉटेलबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. यामुळे सुरक्षा यंत्रणेवर मोठा ताण पडलेला आहे.

काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर शिवाजीराव काळगे,आमदार अमित देशमुख,आमदार धीरज देशमुख शहरातील ग्रँड हॉटेलमध्ये जाऊन राहुल गांधींची भेट घेतली. राहुल गांधी लातुरात मुक्कामी असल्याचे समजताच कार्यकर्त्याचे गट त्यांना भेटण्यासाठी हॉटेलच्या दिशेने आले.

संविधान बदलू देणार नाही- राहुल गांधी

प्रचार सभेत बोलताना राहुल गांधी म्हणाले यावेळची लोकसभेची निवडणूक लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी आहे. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच एका राजकीय पक्षाने संविधानावर आक्रमण करत ते नष्ट करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

 

इंडिया आघाडी लोकशाही व संविधानाचे रक्षणासाठी उभी आहे. मात्रभारतीय जनता पक्ष, नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संविधान व लोकशाही संपवण्यासाठी काम करत आहेत.सत्तेत आल्यानंतर संविधान बदलणारअसल्याचे भाजपचे खासदारच उघडपणे सांगत आहेत.संविधान हे एक पुस्तक नसून गरीब, आदिवासी, दलित, सर्वसामान्य नागरिकांच्या अधिकारांचा दस्ताऐवज आहे. काँग्रेस आणि इंडिया आघाडी ते कोणालाही बदलू देणार नाही, असा इशारा राहुल गांधी यांनीभाजपलादिला आहे.

WhatsApp channel

विभाग