मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Lowest home loan : घर खरेदीसाठी कर्ज घ्यायचंय? 'या' बँका देतायेत सर्वात स्वस्त कर्ज

Lowest home loan : घर खरेदीसाठी कर्ज घ्यायचंय? 'या' बँका देतायेत सर्वात स्वस्त कर्ज

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
Sep 26, 2023 12:45 PM IST

cheapest home loan : गृहकर्ज घेतल्यानंतर अनेक वर्षे प्रत्येकाला ईएमआय भरावा लागतो. याचा कालावधी २० ते ३० वर्षे लागू शकतात.

interest rates ht
interest rates ht

Lowest home loan : गेल्या काही वर्षांपासून घरांच्या किंमतींमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे नव्या अथवा रिसेल फ्लॅट खरेदीसाठी प्रत्येकाला आर्थिक जूळवाजूळव करावी लागत आहे. गृहकर्ज घेणाऱ्यांना आयकरातून सूट दिली जाते. सरकारही गृहकर्जाला प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी विविध प्रकारच्या सवलती जाहीर केली जाते.

व्याजदरावर ठेवा लक्ष

गृहकर्ज घेतल्यावर अनेक लोकांना अनेक वर्षे ईएमआय भरावा लागतो. याचा कालावधी २० ते ३० वर्षे असू शकतो. यासाठी तुम्हाला अशा बँकेची निवड करावी लागेल ज्या बँकेचा ईएमआय कमी असेल. कमी व्याजदराची निवड केल्यानंतर सर्वात जास्त पैसे वाचवू शकतो.

आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत गृहकर्जावर १.५ लाख रुपयांपर्यंतची कर सूट उपलब्ध आहे. जर पती-पत्नी दोघांनी संयुक्त गृहकर्ज घेतले तर दोघांनाही त्यांच्या उत्पन्नातून कर सवलती मिळू शकतात.

जाणून घ्या टाॅप १० बँकांचे व्याजदर

युनियन बँक ऑफ इंडिया

किमान व्याज दर – ८.७%

कमाल व्याज दर – १०.८%

SBI कर्ज

किमान व्याज दर – ८.७%

कमाल व्याज दर – १०.८%

बँक ऑफ बडोदा

किमान व्याज दर – ८.६%

कमाल व्याज दर – १०.५%

 

बँक ऑफ महाराष्ट्र

किमान व्याज दर – ८.६%

कमाल व्याज दर – १०.३%

 

IDBI बँक

किमान व्याज दर – ८.५५%

कमाल व्याज दर – १०.७५%

 

इंडसइंड बँक

किमान व्याज दर – ८.५%

कमाल व्याज दर – १०.५५%

 

बँक ऑफ इंडिया

किमान व्याज दर – ८.५%

कमाल व्याज दर – १०.६%

 

इंडियन बैंक

न्यूनतम ब्याज दर - ८.५%

अधिकतम ब्याज दर - ९.९%

 

पंजाब नेशनल बैंक

न्यूनतम ब्याज दर - ८.५%

अधिकतम ब्याज दर - १०.१%

 

एचडीएफसी बैंक

न्यूनतम ब्याज दर - ८.५%

अधिकतम ब्याज दर - ९.४%

WhatsApp channel

विभाग