मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Tata Motors SBI deal : टाटा मोटर्स एसबीआयमध्ये करार, या ईव्ही खरेदीची योजना

Tata Motors SBI deal : टाटा मोटर्स एसबीआयमध्ये करार, या ईव्ही खरेदीची योजना

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
Mar 01, 2023 09:02 PM IST

Tata Motors SBI deal : टाटा मोटर्सने एसबीआयसोबत करार केला आहे. ग्राहकांना टाटाच्या सर्वाधिक विक्री होणाऱया या ईव्ही खरेदीसाठी हा करार करण्यात आला आहे.

tata ace Ev HT
tata ace Ev HT

टाटा मोटर्स या सर्वात मोठ्या व्यावसायिक वाहन निर्मात्या कंपनीने स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) या देशातील आघाडीच्या सार्वजनिक क्षेत्रातील बँक सोबत करार केला आहे, ज्या अंतर्गत बँक कंपनीला वित्तपुरवठा करेल.

कंपनीने आज जारी केलेल्या निवेदनानुसार, हे भारतातील सर्वात प्रगत, शून्य-उत्सर्जन, चार-चाकी व्यावसायिक वाहन, टाटा एस ईव्हीच्या खरेदीसाठी आर्थिक उपाय करणार आहे, या भागीदारीद्वारे, टाटा मोटर्स हे उपाय ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एसबीआयच्या नेटवर्कचा वापर करणार आहे.

स्टेट बँकेचे उपव्यवस्थापकीय संचालक (रिटेल-अॅग्री, एसएमई आणि एफआय) प्रवीण राघवेंद्र म्हणाले, “एस ईव्हीसाठी आकर्षक वित्तपुरवठा पर्याय ऑफर करण्याच्या प्रयत्नात टाटा मोटर्ससोबत भागीदारी केल्याचा आम्हाला अभिमान आहे. यामुळे नवीन वित्तपुरवठा योजना व्यक्ती आणि एमएसएमईंना अत्याधुनिक आणि पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक मिनी ट्रक खरेदी करण्यास मदत होईल.”.

 टाटा मोटर्सच्या कमर्शियल व्हेईकल बिझनेसच्या विक्री आणि विपणन विभागाचे उपाध्यक्ष राजेश कौल  म्हणाले, “आम्हाला देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियासोबत भागीदारी करताना आनंद होत आहे, ज्याने टाटा एस ईव्ही  ग्राहकांना अनन्य आणि सुलभ वित्तपुरवठा योजना ऑफर केल्या आहेत. हा सामंजस्य करार  ग्राहकांसाठी अधिक सुलभ बनवण्याच्या आमच्या उद्देशाला आणखी बळकटी देतो. आम्हाला विश्वास आहे की हे सहकार्य शाश्वत वाहतुकीच्या दिशेने आमच्या प्रयत्नांना गती देईल आणि नेट-झिरोच्या दिशेने देशाच्या महत्त्वाकांक्षांना समर्थन देईल.”

 

WhatsApp channel

विभाग