bank Stocks : YES बँकेचे शेअर्स गडगडले, SBI मध्ये तुफान तेजी, ६ मार्चच्या ट्रेडिंग सेशनवर लक्ष
bank Stocks : तज्ज्ञांच्या मते, एसबीआयच्या शेअर्समध्ये तेजी आहे. वाढत्या व्याजदराच्या पार्श्वभूमीवर बँकेच्या मार्जिनमध्ये सुधारणा दिसत आहे. सोमवारची सुरुवात एसबीआय, येस बँकेच्या शेअर्ससाठी महत्त्वपूर्ण आहे.
bank Stocks : देशातील सर्वात मोठी सरकारी बँक एसबीआयच्या शेअर्सची किंमत शुक्रवारी ६ टक्के तेजीसह ५६४ रुपयांच्या पातळीवर बंद झाले. दरम्यान, काही वेळातच स्टेट बँकेच्या स्टाॅक्समध्से नफावसूली सुरु झाली. त्यानंतर शेअर्सचा भाव ५५५ रुपयांच्या पातळीवर होते. तर येस बँकेच्या शेअर्समध्ये तब्बल ३ टक्के घसरणीसह बंद झाले, जाणून घेऊया, दोन्ही बँकांच्या शेअर्समध्ये तेजी आणि घसरणीची कारणे पुढीलप्रमाणे -
ट्रेंडिंग न्यूज
तज्ज्ञांचे मत
तज्ज्ञांच्या मते ६ मार्च २०२३ म्हणजे सोमवारचा दिवस या दोन्ही शेअर्ससाठी महत्त्वाचा असणार आहे. सोमवारी येस बँकेतील तीन वर्षांचा लाॅक इन समाप्त झाल्यानंतर एसबीआयची हिस्सेदारी कमी होणार आहे. तज्ज्ञांच्या मते, एसबीआयच्या फंडामेंटल मजबूत आहेत. वाढत्या व्याजदरानंतर एसबीआयच्या मार्जिनमध्ये सुधारणा होण्याची अपेक्षा आहे. सोमवारची सुरुवात एसबीआय आणि येस बँकेसाठी महत्त्वपूर्ण असणार आहे.
येस बँकेसमोर वाढत संकट
प्राॅफिटमार्जिन सिक्यूरिटीजचे रिसर्च हेड अविनाश गोरक्षकर म्हणाले की, एसबीआयद्वारे येस बँकेत तीन वर्षांचा लाॅक इन सोमवारी संपल्यानंतर हिस्सेदारी कमी कऱण्याची योजना आहे. त्यामुळे येस बँकेच्या शेअर्समध्ये घट झाली आहे. एसबीआने कर्ज संकटातून बाहेर काढण्यासाठी येस बँकेला ताब्यात घेतले. गेल्या तीन वर्षांपासून येस बँकेच्या स्थितीमध्ये सुधारणा झाली आहे. मात्र आर्थिक संकटांचे ढग अद्यापही कायम आहेत.
६०० रुपयांपर्यंत जाणार किंमत
एसबीआयची शेअर किंमत ६३० ते ६६० दरम्यान जाण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. ज्यांच्या पोर्टफोलियोमध्ये हा स्टाॅक आहे, त्यांना स्टाॅप लाॅससहित हा स्टाॅक होल्ड करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
येस बँकेच्या शेअर्सला १५ रुपये प्रती शेअर्स पातळीवर मजबूत समर्थन देण्यात आले आहे. ज्यांच्याकडे येस बँक आहे त्यांनी १५ रुपये प्रती शेअर्स रेंजमध्ये खरेदीचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. येस बँकेच्या शेअर्सती किंमत २ टक्के घसरणीनंतर १७ रुपयांच्या पातळीवर आहे.
संबंधित बातम्या
विभाग