मराठी बातम्या  /  बिझनेस  /  mutual funds : या लार्ज कॅपफंडात गुंतवले १० लाख रुपये, मिळाले १८.६४ कोटी रुपये !

mutual funds : या लार्ज कॅपफंडात गुंतवले १० लाख रुपये, मिळाले १८.६४ कोटी रुपये !

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
Jan 16, 2023 03:40 PM IST

mutual funds : या ओपन एन्डेड इक्विटी योजनेत एखाद्या गुंतवणूकदारांनी गुंतवलेले अंदाजे १० लाख रुपये आज १८.६४ कोटींपर्यंत पोहोचले आहेत. कोणता आहे हा म्युच्युअल फंड आणि कशी कराल यात गुंतवणूक हे जाणून घेण्यासाठी लिंकवर क्लिक करा. .

mutual funds HT
mutual funds HT

mutual funds : यूटीआय मास्टर शेअर यूनिट स्कीम ही एक ओपेन. एंडेड इक्विटी योजना आहे जिचा मुख्य उद्देश अशा मोठ्या कंपन्यांमध्ये (लार्ज कॅप कंपन्यांमध्ये) गुंतवणूक करणे आहे. ऑक्टोबर १९८६ मध्ये या फंडाची सुरुवात झाली. गेल्या ३५ वर्षांपासून अधिक कालावधीमध्ये या फंडाने गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे.

या फंडाच्या माध्यमातून ज्या कंपन्यांची सातत्याने महसूल वाढ होत आहे, त्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणे हा त्यामागचा हेतू आहे. जीएआरपी (ग्रोथ अॅट रिजनेबल प्राइस) आणि स्पर्धात्मक फ्रँचायझी या दोन्हीच्या एकत्रित दृष्टिकोनामुळे यूटीआय मास्टर शेअर यूनिट स्कीम पुढील कंपन्यांमध्ये गुंतवणूक करू शकते:-

1. ज्यांच्या दीर्घकाळ वाढ टिकवून ठेवण्याच्या किंवा वाढीव मूल्याचे फायदे घेण्याच्या क्षमतेला बाजार कमी लेखत आहे.

2. अनुकूल मागणी चक्र, एकत्रीकरण, अडसर ठरणाऱ्या नियामकांना मंजूरी अशा उद्योग व्यापी घटनांमुळे किंवा किंमत स्पर्धात्मकता आणि विवेकपूर्ण क्षमता विस्तार अशा कंपनी च्या विशिष्ट घटकांमुळे वाढीचा मार्ग सुधारत आहे.

3. अशा कंपन्या ज्यांचा व्यवसाय हा भांडवल गहन आहे पण त्या विवेकबुद्धी ने गुंतवणूक करून त्यास अत्यंत कार्यक्षमतेने अमलात सुद्धा आणतात.

4. ज्या कंपनींना कॅपिटल एम्प्लॉयएड वर जास्त परतव्याने (रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड) कॅश फ्लो ची पुनर्गुंतवणूक करण्याची संधी असते.

5. ज्या कंपनीचे त्या क्षेत्रामधील सापेक्ष मूल्यांकन चांगले व आकर्षक आहे.

यामुळे गुंतवणूकदारांना उत्तम गुणवत्तेच्या व दर्जेदार कंपन्यांचा समावेश असलेल्या पोर्टफोलिओ मधून दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्याची संधी मिळते.

या पोर्टफोलियोंचा फंडात समावेश

लार्ज कॅप फंड म्हणून वर्गीकृत केलेली यू टी आय मास्टर शेअर यूनिट स्कीम च्या पोर्टफोलिओ मध्ये आयसीआयसीआय बँक लिमिटेड, एचडीएफसी लिमिटेड, इन्फोसिस लिमिटेड, अॅक्सिस बँक लिमिटेड, भारती एयरटेल लिमिटेड, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, एचडीएफसी बँक लिमिटेड, मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड, कोटक महिंद्रा बँक लिमिटेड आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड आणि सर्वात महत्वाच्या १० समभागांचा सुमारे ५०% वाटा आहे. ही योजना आतापर्यंत म्हणजे ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत ऑटोमोबाइल, ऑटो कॉम्पोनंट, कॅपिटल गुडस्, ग्राहक सेवा, टेलीकम्यूनीकेशन, कनस्यूमर डयूरेबलस् यामध्ये अधिक मजबूत तर तेल, गॅस, उपभोग्य इंधन, एफ एम सी जी, धातू आणि खाण काम, वीज आणि बांधकाम साहित्य यामध्ये थोडी कमकुवत आहे.

आतापर्यंत ४३०० कोटींपेक्षा जास्त डिव्हिंडंटचे वितरण

या फंड मध्ये आता ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत ७.५० लाख गुंतवणूकदारांच्या खात्यासह रू १०,००० कोटी हून जास्त निधी आहे. या फंडाचे उद्दिष्ट दीर्घकालीन भांडवल वाढ किंवा उत्पन्नाचे वितरण मिळवणे हे आहे. हा फंड वर सांगितलेल्या प्रमाणे शिस्तशीर पद्धतीने गुंतवणूक करतो आणि त्याने सुरुवातीपासून दरवर्षी वार्षिक लाभांश चा प्रवाह कायम ठेवला आहे. यूटीआय मास्टर शेअर यूनिट योजनेने आतापर्यंत एकूण रू ४३०० कोटी हून जास्त डिवीडंट वाटले आहेत. तर यूटीआय मास्टर शेअर यूनिट योजनेने (सीएजीआर CAGR) १५.५२% एवढा रिटर्न मिळवला आहे. या शिवाय सुरुवातीला १० लाखाची गुंतवणूक असलेला हा फंड जो एसअँडपी (S&P) बीएसइ (BSE) १०० टीआरआय (TRI) च्या रू १२.४९ कोटींच्या मानकाच्या तुलनेत तेवढ्याच कालावधीमध्ये १८.६४ कोटी एवढा वाढला आहे म्हणजे त्याने गेल्या ३६ वर्षांमध्ये १८६ पट रिटर्न्स मिळविले आहेत.

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग