मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Petrol Diesel price Today : पेट्रोल डिझेलच्या किंमतींनी तुमच्या 'बजेट'वर परिणाम किती ? जाणून घ्या दर

Petrol Diesel price Today : पेट्रोल डिझेलच्या किंमतींनी तुमच्या 'बजेट'वर परिणाम किती ? जाणून घ्या दर

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
Jan 31, 2023 08:30 AM IST

Petrol Diesel price today 31 January 2023 : दिल्लीत एक लिटर पेट्रोल ९६.७२ रुपये प्रति लीटर तर डिझेल ८९.६२ रुपये प्रति लिटर दराने उपलब्ध आहे. मुंबईत पेट्रोलचा दर १०६.३१ रुपये आणि डिझेलचा दर ९४.२७ रुपये प्रतिलिटर आहे.

petrol diesel price HT
petrol diesel price HT

Petrol Diesel price today 31 January 2023 : तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले आहेत. आज कंपन्यांनी दिल्ली आणि चेन्नईमध्ये किंमतींमध्ये फरक झाला आहे. काही महिन्यांपूर्वी सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करण्याची घोषणा केली होती. बजेटच्या आधी एक दिवस जाहीर झालेले आजचे पेट्रोल डिझेल दराची आकडेवारी महत्त्वपूर्ण आहे.

आजचे दर

आज दिल्लीत एक लिटर पेट्रोल ९६.७२ रुपये प्रति लीटर तर डिझेल ८९.६२ रुपये प्रति लिटर आहे. मुंबईत पेट्रोलचा दर १०६.३१ रुपये आणि डिझेलचा दर ९४.२७ रुपये प्रतिलिटर आहे. कोलकात्यात पेट्रोलचा दर १०६.०३ रुपये तर डिझेलचा दर ९२.७६ रुपये प्रति लिटर आहे. तर चेन्नईमध्येही पेट्रोल १०२.६३ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ९४.२४ रुपये प्रति लिटर आहे.

दररोज सकाळी सहा वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल होतो. नवे दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होणार आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळपास दुप्पट होते.

एसएमएसवर जाणून घ्या दर

पेट्रोल आणि डिझेलची किंमत एसएमएसद्वारेही कळू शकते. इंडियन ऑइलच्या वेबसाइटवर जाऊन तुम्हाला RSP आणि तुमचा शहर कोड लिहावा लागेल आणि तो 9224992249 या क्रमांकावर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे, जो तुम्हाला IOCL च्या वेबसाइटवरून मिळेल.

शहरपेट्रोल (रु.प्रती लीटर)डिझेल (रु.प्रती लीटर)
गुडगाव९६.९७८९.८४
नोएडा९६.६०८९.७७
बंगळूरु१०१.९४८७.८९
भूवनेश्वर१०३.६०९५.१५
चंदीगड९६.२०८४.२६
हैदराबाद१०९.६६९७.८२
जयपूर१०९.४६९४.६१
लखनऊ ९६.५७८९.७६

देशाच्या विविध शहरांतील किंमती

 

 

WhatsApp channel

विभाग