Petrol Diesel price today 26 September 2023 : आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाच्या किंमतींमध्ये आज किंचित घसरण झाली आहे. याचा परिणाम भारतातील तेलाच्या किंमतींवर फारसा दिसत नाहीये. डब्ल्यूटीआय क्रूड ०.०२ टक्के वाढीसह ८९.७० डाॅलर्स प्रती बॅरल्स आणि ब्रेंट क्रूड ०.०७ टक्के घसरणीसह ९३.२२ डाॅलर्स प्रति बॅरल्सवर विकले जात आहे.
महाराष्ट्रात तेलाच्या किंमती बऱ्याच काळापासून स्थिर आहेत. पेट्रोल १०६.३१ रूपये लीटर आणि डिझेल ९४.२७ प्रति लीटर आहे. मध्यप्रदेशात पेट्रोल ३६ पैशांनी महाग झाले असून सुधारित पेट्रोल दर १०८.६५ रुपये तर डिझेल ९३.९० रुपये प्रति लीटरवर विकले जात आहे. झारखंडमध्ये पेट्रोल ९९.८४ रुपये प्रति लीटर तर डिझेल ९४.६५ रुपये प्रति लीटरवर विकले जात आहे.
- दिल्लीत पेट्रोल ९६.७२ रुपये आणि डिझेल ८९.६२ रुपये प्रति लिटर
- मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये आणि डिझेल ९४.२७ रुपये प्रति लिटर
- कोलकात्यात पेट्रोल १०६.०३ रुपये आणि डिझेल ९२.७६ रुपये प्रति लिटर
- चेन्नईमध्ये पेट्रोल १०३.०७ रुपये आणि डिझेल ९४.६६ रुपये प्रति लिटर
पेट्रोल आणि डिझेलची किंमत एसएमएसद्वारेही कळू शकते. इंडियन ऑइलच्या वेबसाइटवर जाऊन तुम्हाला RSP आणि तुमचा शहर कोड लिहावा लागेल आणि तो ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे, जो तुम्हाला IOCL च्या वेबसाइटवरून मिळेल.
संबंधित बातम्या