मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Share tips : नायकाला ५.२ कोटींचा नफा, ६० टक्के घसरणीनंतर शेअर खरेदीसाठी झुंबड

Share tips : नायकाला ५.२ कोटींचा नफा, ६० टक्के घसरणीनंतर शेअर खरेदीसाठी झुंबड

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
Nov 01, 2022 03:05 PM IST

गेल्या आठवड्यात तब्बल ६० टक्क्यांनी गटांगळी खाल्यानंतर नायका कंपनीच्या शेअर खरेदीसाठी आता झुंबड उडाली आहे. कंपनीने जूलै ते सप्टेंबर या तिमाहीत चांगला नफा कमावला आहे.

nykaa Share HT
nykaa Share HT

Share tips to buy Nykaa : नायकाने (Nykaa) जुलै-सप्टेंबर तिमाहीत 5.2कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा कमावला आहे. कंपनीचा नफा एका वर्षापूर्वी याच तिमाहीत १ कोटी रुपयांच्या घरात होता. म्हणजेच एका वर्षात त्यात तब्बल ३३०% वाढ झाली आहे. त्याच वेळी जून तिमाहीत नायकाचा निव्वळ नफा ५ कोटी रुपये होता. या बातमीनंतर इंट्राडे ट्रेडिंगमध्ये नायकाचा शेअर्स बीएसईवर ४% पेक्षा जास्त वाढून १२०८ वर पोहोचले.

महसूल ३९% वाढला

कंपनीचा ऑपरेशन्समधील महसूल ३९% वाढून १२३० कोटी रुपये झाला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत महसूल ८८५ कोटी रुपये होता. नायकाचा तिमाही-दर-तिमाही महसूल 7% वाढून ११४८.८ कोटी झाला.

पदार्पणापासून स्टॉक 48% घसरला

मंगळवारच्या दुपारच्या व्यवहारात बीएसईवर नायकाचे समभाग ४% पेक्षा जास्त वाढून १२०८ रुपयांवर पोहोचले. नायका़चे शेअर्स गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये सूचीबद्ध झाले होते आणि शेअर बाजारात पदार्पण झाल्यापासून ४८% पेक्षा जास्त घसरला आहे. पेटीएम, झोमॅटो, नायका, पीबीृ फिनटेक, डेलिव्हरी यासह इतर नवीन युगातील तंत्रज्ञान समभाग सर्वात जास्त तोट्यात आहेत.

 

WhatsApp channel

संबंधित बातम्या