मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Gold Silver Price Today : गुडन्यूज ! सोने चांदी दोन्हीही झाले स्वस्त, इतक्या रुपयांची झाली घसरण

Gold Silver Price Today : गुडन्यूज ! सोने चांदी दोन्हीही झाले स्वस्त, इतक्या रुपयांची झाली घसरण

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
Sep 26, 2023 08:46 AM IST

Gold Silver price today 26 September 2023 : इंडियन बुलियन्स ज्वेलर्स असोसिएशनच्या संकेतस्थळानुसार,सोने चांदीच्या किंमतींमध्ये आज घसरण झाली आहे.

gold HT
gold HT

Gold Silver price today 26 September 2023 : इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाइटनुसार, सोमवारी सोन्याचा दर प्रति दहा ग्रॅम ५९१०४ रुपयांवर बंद झाला. शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी तो ५९१३४ रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर बंद झाला होता. त्यामुळे आज सोन्याच्या किंमतींमध्ये ३० रुपये प्रति दहा ग्रॅमची घसरण झाली.

CTA icon
तुमच्या शहरातील सोन्याचा आजचा भाव पाहण्यासाठी इथं क्लिक करा

सोनं सध्या २,४८१ रुपये प्रति १० ग्रॅमने स्वस्त विकलं जात आहे. ११ मे २०२३ रोजी सोन्याने सर्वकालीन उच्चांक गाठला होता. त्यावेळी सोन्याचा भाव ६१५८५ रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर गेला होता.

चांदीचे दर

सोमवारी चांदीचा दर ७२६५७ रुपये प्रति किलोवर उघडला. शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी चांदी ७३१७५ रुपये प्रतिकिलो दरावर बंद झाली होती. त्यामुळे चांदीचा दर प्रति किलो ५१८ रुपयांच्या घसरणीसह उघडला.

गेल्या आठवड्यात चांदीचा दर वाढीसह बंद झाला. गेल्या शुक्रवारी चांदीचा दर ७३१७५ रुपये प्रति किलोवर बंद झाला होता. तर सोमवारी चांदीचा दर ७२२१२ रुपये प्रति किलोवर बंद झाला होता. अशाप्रकारे संपूर्ण आठवड्यात चांदीमध्ये ९६३ रुपयांची वाढ झाली.

आजचे सोने चांदीचे दर मोबाईलवर चेक करा

२२ कॅरेट आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यांचा किरकोळ दर जाणून घेण्यासाठी तुम्ही 8955664433 वर मिस कॉल करू शकता. थोड्याच वेळात एसएमएसद्वारे दर मिळेल. यासोबतच तुम्ही सतत अपडेट्ससाठी आयबीजेएच्या संकेतस्थळाला भेट देऊ शकतात.

WhatsApp channel

विभाग