मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Gold Silver Price Today : संडे स्पेशल, सोने चांदी उच्चांकी पातळीवरुन झाले स्वस्त, पाहा आजचे दर

Gold Silver Price Today : संडे स्पेशल, सोने चांदी उच्चांकी पातळीवरुन झाले स्वस्त, पाहा आजचे दर

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
May 21, 2023 07:55 AM IST

Gold Silver price today 21 May 2023 : इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या संकेतस्थळानुसार, आज रविवारी सराफा बाजारात सोने चांदीच्या किंमती उच्चांकी पातळीवरुन स्वस्त झाले आहेत.

gold silver HT
gold silver HT

Gold Silver price today 21 May 2023 इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या संकेतस्थळानुसार, आज रविवारी सराफा बाजारात सोने चांदीच्या किंमती उच्चांकी पातळीवरुन स्वस्त झाले आहेत.

CTA icon
तुमच्या शहरातील सोन्याचा आजचा भाव पाहण्यासाठी इथं क्लिक करा

शुक्रवारी संध्याकाळी सोन्याचा बंद भाव ६०,२७५ रुपयांवर स्थिरावला. सकाळी हा दर ६०३०२ रुपये होता. त्यामुळे आज सकाळ ते संध्याकाळ दरम्यान सोन्याच्या दरात २७ रुपयांची घसरण झाली आहे.

दुसरीकडे, मागील व्यवहाराच्या दिवशी सोन्याचा भाव ६०४७४ रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर बंद झाला होता. अशा प्रकारे मागील दिवसाच्या तुलनेत तो १९९ रुपये प्रति १० ग्रॅमच्या घसरणीसह बंद झाला आहे. सोन्याच्या किंमती आपल्या उच्चांकी पातळीच्या तुलनेत आज तब्बल १३७१ रुपयांनी स्वस्त झाल्या आहेत.

चांदीचे दर

चांदीचा दर ७१७८४ रुपये प्रति किलोवर बंद झाला. हा दर शुक्रवारी सकाळी ७१८३४ रुपये प्रति किलो या पातळीवर उघडला. त्यामुळे सकाळ ते संध्याकाळ दरम्यान चांदीच्या दरात ५० रुपयांची घसरण झाली आहे.

दुसरीकडे, चांदी ४,६८० रुपयांच्या सार्वकालिक उच्चांकाच्या खाली व्यवहार करत आहे. ४ मे रोजी चांदीने ७६४६४ रुपयांचा सार्वकालिक उच्चांक गाठला होता.

असे चेक करा तुमच्या शहरांतील किंमती

२२ कॅरेट आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यांचा किरकोळ दर जाणून घेण्यासाठी तुम्ही 8955664433 वर मिस कॉल करू शकता. थोड्याच वेळात एसएमएसद्वारे दर मिळेल. यासोबतच तुम्ही सतत अपडेट्ससाठी आयबीजेएच्या संकेतस्थळाला भेट देऊ शकतात.

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग