मराठी बातम्या  /  बिझनेस  /  HDFC FD rates : एचडीएफसीच्या एफडीवरील व्याजदरात १ ऑक्टोबरपासून घट, आत्ताच गुंतवणूक करा अन्यथा...

HDFC FD rates : एचडीएफसीच्या एफडीवरील व्याजदरात १ ऑक्टोबरपासून घट, आत्ताच गुंतवणूक करा अन्यथा...

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
Sep 25, 2023 05:28 PM IST

HDFC Fixed deposit rates : एचडीएफसी बँकेच्या विशेष आवृत्ती मुदत ठेव योजनेच्या दोन वर्षांवरील मुदत ठेवींवरील व्याजदरात कपात करणार आहे. अशा परिस्थितीत अधिक परतावा मिळवण्यासाठी आताच गुंतवणूक करावी का? जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

HDFC bank HT
HDFC bank HT

HDFC Fixed deposit rates : जर तुम्हाला एचडीएफसी बँकेच्या विशेष आवृत्ती मुदत ठेव योजनेत गुंतवणूक करून अधिक परतावा मिळवायचा असेल तर गुंतवणूकीसाठी आत्ताच योग्य वेळ आहे. कारण १ आँक्टोबरपासून एचडीएफसी बँक या एफडी योजनेंवरील व्याजदरात घट करत आहे. यामुळे गुंतवणूकदारांच्या नफ्यात घट होईल. बँकेने आपल्या गुंतवणूकदारांना तशा प्रकारच्या सुचना ईमेलद्वारे पाठवल्या आहेत.

HDFC Bank स्पेशल एडीशन एफडी व्याजदर

एचडीएफसी बँकेने २९ मे २०२३ ला स्पेशल एडीशन एफडी व्याजदर जाहीर केला. यात बँकेने आपल्या ग्राहकांना सर्वाधिक व्याजदर देऊ केला होता. या एफडीवर बँकेने ३५ महिन्यांच्या कालावधीत ७.२० टक्के व्याजदर देत आहे. याशिवाय ५५ महिन्यांच्या कालावधीवर ७.२५ टक्के व्याजदर देत आहे. त्याशिवाय समान अटींवर ज्येष्ठ नागरिकांना समान कालावधीसाठी ७.७ टक्के व्याजदर आणि ५५ महिन्यांच्या कालावधीसाठी ७.७५ टक्के व्याज दिले जाईल.

एचडीएफसी बँकेच्या मुदत ठेवींवरील व्याजदर

सध्याच्या स्थितीत एचडीएफसी बँक ७ ते २९ दिवसांच्या कालावधींसाठी ३ टक्के व्याजदर देत आहे. ३० ते ४५ दिवसांच्या मुदतीच्या एफडीवर ३.५० टक्के व्याज दिले जात आहे. ३० ते ४५ दिवसांच्या कालावधीवरील एफडीवर ३.५० टक्के व्याजदर दिले जात आहे. ४६ दिवस ते सहा महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या एफडीवर ४.५० टक्के व्याज देत आहे. त्याचप्रमाणे, बँक ६ महिने ते एक दिवस आणि ९ महिन्यांपेक्षा कमी मुदतीच्या एफडीवर ५.७५ टक्के व्याज दर देते. एचडीएफसी बँक नऊ महिने ते एक दिवस आणि एक वर्षापेक्षा कमी मुदतीच्या एफडीवर ६ टक्के व्याजदर देत आहे.

आवर्ती ठेव मुदत योजना

एचडीएफसी बँक ६ महिने ते १२० महिन्यांच्या कालावधीसह आवर्ती ठेवींवर सामान्य नागरिकांसाठी ४.५०% ते ७.१०% दरम्यान व्याजदर देत आहे.

WhatsApp channel

विभाग