मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Sensex 2022 : वर्षाच्या शेवटी सेन्सेक्स निफ्टीत घसरण, हे शेअर्स ठरले टाॅप गेनर्स

Sensex 2022 : वर्षाच्या शेवटी सेन्सेक्स निफ्टीत घसरण, हे शेअर्स ठरले टाॅप गेनर्स

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
Dec 30, 2022 05:11 PM IST

Sensex 2022 : २०२२ च्या शेवटच्या ट्रेडिंग दिवशी म्हणजेच शुक्रवारी भारतीय शेअर बाजारात घसरण झाली. सेन्सेक्स २९३ अंशांनी घसरून ६०८४० वर बंद झाला.निफ्टीतही घसरण झाली.

Sensex down HT
Sensex down HT

२०२२ च्या शेवटच्या ट्रेडिंग दिवशी म्हणजेच शुक्रवारी भारतीय शेअर बाजारात घसरण झाली. सेन्सेक्स २९३ अंशांनी घसरून ६०८४० वर बंद ०झाला. निफ्टी ८५ अंशांनी घसरून १८१५० च्या पातळीवर आला. सेन्सेक्समधील ३० पैकी १८ समभाग घसरले. त्याचवेळी १२ समभागांमध्ये तेजी दिसून आली.

एसबीआय लाइफ-आयशर मोटर्स टॉप गेनर

एसबीआय लाइफ, आयशर मोटर्स, ग्रासिम, आयसीआयसीआय बँक, भारती एअरटेल, आयटीसी आणि एचडीएफसी यासह २९ निफ्टी-५० तील समभाग घसरले. दुसरीकडे, बजाज फिनसर्व्ह, बजाज ऑटो, टायटन, ओएनजीसी, कोल इंडिया, बीपीसीएल, अदानी एंटरप्रायझेस आणि बजाज फायनान्ससह २१ निफ्टी समभागांमध्ये वाढ झाली.

एफएमसीजी क्षेत्रातील सर्वात मोठी घसरण

एनएसईच्या ११ क्षेत्रीय निर्देशांकांपैकी ७ मध्ये घसरण झाली. सर्वात मोठी घसरण एफएमसीजी क्षेत्रात झाली. बँक, वाहन, वित्तीय सेवा, आयटी, फार्मा आणि खाजगी बँक क्षेत्रांमध्येही घसरण झाली. दुसरीकडे, पीएसयू बँक क्षेत्राने सर्वाधिक १.५१% वाढ केली. याशिवाय मीडिया, मेटल आणि रियल्टी क्षेत्रातही तेजी दिसून आली.

गुरुवारी बाजार घाईघाईने बंद झाला

याआधी आठवड्याच्या चौथ्या व्यवहाराच्या दिवशी म्हणजेच गुरुवारी (डिसेंबर 29) शेअर बाजारात तेजी होती. सेन्सेक्स २२३ अंशांनी वाढून ६१,१३३ वर बंद झाला. निफ्टीने ६८ अंशांच्या वाढीसह १८,१९१ चा स्तर गाठला होता.

WhatsApp channel

विभाग