मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Insurance Premium : कार, प्रॉपर्टीसह विविध प्रकारचा विमा महागणार, जीवन विम्याचं काय? वाचा!

Insurance Premium : कार, प्रॉपर्टीसह विविध प्रकारचा विमा महागणार, जीवन विम्याचं काय? वाचा!

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
May 10, 2023 11:30 AM IST

Insurance Premium : आम आदमीवर अजून एक आर्थिक बोझा वाढणार आहे. वास्तविक विमा प्रिमियमध्ये १० टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. री इन्शुअरन्स काॅट्समध्ये वाढ झाल्याने येणाऱ्या काळात आॅटो इन्शुसन्समध्ये १० ते १५ टक्के वाढ होण्याची शक्यता आहे.

insurance HT
insurance HT

Insurance Premium : आम आदमीवर महागाईचा बोझा आणखीन वाढण्याची शक्यता आहे. वास्तविक, विम्याचा प्रिमियममध्ये १० टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे. मिडिया रिपोर्टनुसार, भारतीय कंपन्या आणि मोटर वाहन मालकांसाठी विम्याच्या खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे.

युक्रेन युद्ध आणि जगभरातील आर्थिक संकटामुळे इतर नुकसान होण्याची शक्यता अधिक आहे. यामुळे पूर्नविमाकर्त्यांनी दरात ४० ते ६० टक्के वाढ केली आहे. देशातील जनरल इन्शुरन्स कंपन्यांच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, आर्थिक वर्ष २०२३ मध्ये जनरल इन्शुरन्सच्या व्यापारातील आॅटो इन्शुरन्स प्रिमियमचा हिस्सा ८१,२९२ कोटी रुपये आहे. तज्ज्ञांच्या मते, री इन्शुरन्स काॅस्टमध्ये वाढ झाल्यामुळे येणाऱ्या काळात आॅटो इन्शुरन्समध्ये १० ते १५ टक्के वाढ झाली आहे.

खर्चात वाढ

देशाच्या जनरल इन्शुरन्स इंडस्ट्रीमध्ये २४ कंपन्यांचा समावेश आहे. या सर्व कंपन्या मिळून जनरल इन्शुरन्स इंडस्ट्रीमध्ये ८४ टक्के मार्केट हिस्सा आहे.

वाहन विमा अनिवार्य

सर्व वाहन मालकांना वाहन विमा काढणे अनिवार्य आहे. तज्त्रांच्या मते, नुकतीच झालेल्या वाढीमुळे कार, बाईक्स आणि व्यावसायिक वाहनांसाठी इन्शुरन्स खरेदी करण्यासाठी प्रिमियम दरात पुढील काही महिन्यात १० ते १५ टक्के वाढ होण्याची शख्यता आहे.

बँकांनी व्याजदरात केली वाढ

मिडिया रिपोर्टनुसार, जगातील पश्चिम भागातील देशांतील केंद्रीय बँकांनी गेल्या वर्षभरात व्याजदरात ४.५ ते ५ टक्के वाढ केली आहे. यामुळे पूर्नविमाकर्त्यांच्या विमा खर्चात वाढ झाली आहे. याशिवाय युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवरही या उद्योगाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

तर दुसरीकडे, आॅटो इन्शुरन्स अनिवार्य आहे. आर्थिक वर्ष २०२३ मध्ये जनरल इन्शुरन्सच्या संपूर्ण व्यवसायात आॅटो इन्शुरन्स प्रिमियमची हिस्सेदारी ८१.२९२ कोटी आहे. तज्ज्ञांच्या मते री इन्शुरन्स काॅस्टमध्ये वाढ झाल्याने येणाऱ्या काळात आॅटो इन्शुरन्समध्ये १० ते १५ टक्के वाढ होण्याची शक्या आहे. जर अद्यापही तुम्ही विमा काढला नसेल तर तो त्वरित काढावा. अन्यथा त्यात १० टक्के वाढ होण्याची शक्यता आहे, असे तज्ज्ञांनी सांगितले.

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग