मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Marriage Problems : विवाहात येतात अडचणी मग त्यामागे 'हे' असू शकतं कारण

Marriage Problems : विवाहात येतात अडचणी मग त्यामागे 'हे' असू शकतं कारण

Dilip Ramchandra Vaze HT Marathi
May 23, 2023 02:29 PM IST

Marriage Problems : काही कमनशीबी असे असतात ज्यांचं काहीही केल्या लग्न जुळत नाही किंवा लग्न जुळायला अनेक वर्ष वाया जातात. मग अशा व्यक्तींच्या कुंडलीत दोष आहे असं म्हटलं जातं.

लग्न कुंडलीतला दोष म्हणजे नेमकं काय
लग्न कुंडलीतला दोष म्हणजे नेमकं काय (HT)

लग्न हे नातं सर्वांच्या पलिकडचं असतं. लग्न म्हणजे दोन जीवांचं नाही तर दोन परिवारांचं मिलन असतं. लग्न व्हावं, आपलाही एक साथीदार असावा असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. बहुतांश व्यक्तींचं ते स्वप्न पूर्णत्वाला जातं. मात्र काही कमनशीबी असे असतात ज्यांचं काहीही केल्या लग्न जुळत नाही किंवा लग्न जुळायला अनेक वर्ष वाया जातात. मग अशा व्यक्तींच्या कुंडलीत दोष आहे असं म्हटलं जातं.

कुंडलीत दोष असेल तर लग्नाला बाधा येतात हे खरं आहे. मात्र कुंडलीत नेमका काय दोष असेल तर लग्न जुळत नाही हे आपल्याला माहिती आहे का. चला तर आपण याच विषयावर आज बोलूया. कुंंडलीतल्या कोणत्या दोषाने लग्न जुळण्यास अडचणी येतात आणि त्यावर काय केलं गेलं पाहिजे.

कुंडलीत लग्न दोष कोणते असतात?

सप्तमात शुक्र, बुध आणि चढत्या भावात मंगळ व शनि असल्यास त्या राशीच्या लग्नात विलंब होतो. जर ती स्त्री असेल तर लग्न वयाच्या ३६ वर्षांपर्यंत होत नाही किंवा लग्न झालं असेल तर ते तुटते.

सातव्या भावात शनि असेल आणि त्याला सूर्य आणि मंगळ पाहात असतील अर्थात त्यांची नजर मंगळावर असेल तर लग्नाला उशीर होतो.

सातव्या घराचा स्वामी केतूसोबत बसल्यास आणि सातव्या भावात सूर्य आणि मंगळ असल्यास विवाहात विलंब होण्याची शक्यता असते

एकतर सप्तम भावात एखादा ग्रह नीच राशीत बसला असेल किंवा सप्तम भावात अशुभ योग तयार होत असेल तर सप्तमातल्या या पिडेमुळे लग्नात विलंब होतो.

जर एखाद्या स्त्रीच्या कुंडलीत मंगळ दुर्बल असेल आणि पतीचा करक गुरू शनी राहु नीच असेल तर त्या स्त्रीचे लग्न निश्चितच लांबते आणि तिला पतीकडून अल्पच सुख मिळते.

यावर कोणते उपाय करावेत?

स्त्री असो की पुरुष, लग्नाला उशीर होत असेल तर दर गुरुवारी पाण्यात हळद टाकून स्नान करावे.

दर गुरुवारी गंगाजलात हळद टाकून अर्धे पाणी केळीच्या झाडाला आणि अर्धे पिंपळाच्या झाडाला अर्पण करावे.

लवकर लग्नासाठी दर गुरुवारी विष्णू मंदिराची स्वच्छता करावी.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग