स्वप्न ज्या प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीची असतात, त्याचप्रमाणे प्रत्येक स्वप्नाचा काहीतरी खास अर्थ दडलेला असतो असं स्वप्नशास्त्र सांगतं. आज आपण अशाच एका स्वप्नाबद्दल बोलणार आहोत. आज आपण स्वप्नात ट्रेन सुटण्याचा अर्थ काय असतो हे पाहाणार आहोत.
ट्रेन सुटतानाचं स्वप्न पाहणे अशुभ मानलं गेलं आहे. येत्या काही दिवसात तुम्हाला तुमच्या कामात अपयशाचा सामना करावा लागणार आहे असा या स्वप्नाचा अर्थ होतो. तुम्हाला तुमच्या कामात अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो याचं हे स्वप्न द्योतक आहे.
स्वप्न शास्त्रानुसार स्वप्नात ट्रेन पाहण्याचा अर्थ शुभ मानला जातो. हे स्वप्न सूचित करते की तुम्ही येत्या काही दिवसात फिरायला जाणार आहात. तुम्ही प्रवासाचा खूप आनंद घ्याल. हे स्वप्न पाहाणं शुभ मानलं गेलं आहे.
जर तुम्ही स्वप्नात ट्रेनने प्रवास करताना दिसले तर हे स्वप्न लाभदायक मानले जाते. येत्या काही दिवसात तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत बाहेर जाण्याचा किंवा तुमच्या मित्रांसोबत हँग आउट करण्याचा प्लॅन करू शकता असं स्वप्नशास्त्र सांगतं.
स्वप्न शास्त्रानुसार ट्रेनचा पाठलाग करण्याचे स्वप्न अशुभ मानले जाते. हे स्वप्न सूचित करते की येत्या काही दिवसात तुम्ही यशापासून खूप दूर जाणार आहात आणि तुम्ही कितीही मेहनत केली तरी यश तुमच्यापासून खूप दूर असेल. त्यामुळे हे स्वप्नं अत्यंत अशुभ मानलं गेलं आहे.
ट्रेन चालवण्याचे स्वप्न पाहण्याचा अर्थ शुभ मानला जातो. येत्या काही दिवसांत तुमच्यावर मोठी जबाबदारी येणार आहे. हे स्वप्न जीवनात यश दर्शवते.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या