मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  lucky zodiac signs : मोठी आर्थिक गुंतवणूकीकरीता योग्य दिवस; या ५ राशींना अपेक्षेप्रमाणे यश मिळेल

lucky zodiac signs : मोठी आर्थिक गुंतवणूकीकरीता योग्य दिवस; या ५ राशींना अपेक्षेप्रमाणे यश मिळेल

Priyanka Chetan Mali HT Marathi
Apr 20, 2024 02:28 PM IST

Lucky Rashi Bhavishya 20 April 2024 : आज २० एप्रिल २०२४ शनिवार रोजी, कोणत्या राशींचे भाग्य उजळेल कोणाला नशीबाची उत्तम साथ मिळेल. जाणून घ्या शुभ मुहूर्त व योगात कोणत्या ५ राशीच्या लोकांना दिवस फायदेशीर ठरेल.

लकी राशीभविष्य २० एप्रिल २०२४
लकी राशीभविष्य २० एप्रिल २०२४

आज शनिवार २० एप्रिल रोजी, सिंह राशीनंतर चंद्र कन्या राशीत जाणार आहे. तसेच आज चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वादशी तिथी असून या दिवशी ध्रुव योग, त्रिपुष्कर योग आणि पूर्वा फाल्गुनी नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने आजच्या दिवसाचे महत्त्व वाढले आहे. ज्योतिष शास्त्रानुसार ५ राशींना आज शुभ योगाचा लाभ मिळणार आहे.

मेषः 

आज मनःशांती मिळेल. यशस्वी व्हाल. प्रेमप्रकरणात यश मिळेल. नोकरीत आत्मविश्वास द्विगुणित होईल. उद्योग व्यापारात अर्थिक स्तोत्र निर्माण होतील. इच्छित फळ मिळणार आहे. कुटूंबात स्नेह वाढेल. मोठे आर्थिक व्यवहार करण्यास उपयुक्त दिवस आहे. आनंदाची बातमी मिळेल. तुम्हाला कार्यक्षेत्रात नावलौकिकता प्राप्त होईल. आजचा दिवस यशप्राप्तीचा आहे.

कर्क: 

आज घर सजवण्याचे स्वप्न साकार होईल. धंद्यात वाढ होईल. कष्टाच्या मानाने लाभ कमी मिळेल. रोजगारात तुमची प्रगती होईल. कार्यक्षेत्रात उत्तम प्रदर्शन कराल. पदोन्नती व प्रगती होईल. विद्यार्थांना नवनवीन क्षेत्रात यश संपादनाची संधी मिळेल. कलाक्षेत्रातील महिला अनुकूल प्रगतीचं शिखर गाठतील. गुंतवणूक फायदेशीर ठरेल. नोकरी व्यवसायात मात्र आपला वेगळा ठसा उमटवाल. नोकरीत योग्य मान सन्मान मिळेल. वाहन घर खरेदी करता योग आहे.

सिंह: 

आज जोडीदाराची साथ चांगली मिळेल. नवीन घर स्थावर खरेदीचे योग येऊ शकतात. व्यवसायात मनाप्रमाणे कामे मिळतील. व्यावसायिक किवा खाजगी कामासाठी प्रवास घडेल. अनुकुल फळ प्राप्त होतील. मान सन्मान मिळेल. वाहन घर खरेदी करू शकतात. वडिलोपार्जित इस्टेटीतून लाभ होईल. व्यवसायातील यश मिळाल्याने आनंदी राहाल.

वृश्चिक: 

आज आर्थिक उलाढाली यशस्वी ठरतील. पैशाची अडकलेली कामे पार पडतील. मोठ्या भावंडांची साथ चांगली मिळेल. व्यापारात फायदा होईल. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींची प्रतिष्ठा वाढेल. नोकरीत बढतीची संधी आहे. कल्पनाशक्तीला वाव मिळेल. विद्यार्थ्यांकडून विद्याभ्यासात प्रगती होईल. कौटुंबिक स्नेह निर्माण होईल. मध्यस्थ म्हणून जवळचा मित्र खूप उपयोगी येईल.

कुंभः 

आज प्रतिष्ठीत व्यक्तींच्या गाठीभेटी होतील. सामाजिक कार्यात भाग घ्याल. काम करण्यास उत्साह येईल. वारसा हक्काने धनप्राप्तीची शक्यता राहील. संशोधन क्षेत्रात प्रगती कराल. आकस्मिक धनलाभाचा योग आहे. व्यापार रोजगारात अपेक्षेप्रमाणे यश मिळेल. जिवनाचा मनसोक्त आनंद घ्याल. कामाच्या ठिकाणी कौतूक केले जाईल. मानसन्मान मिळेल. यश मिळाल्याने मन प्रसन्न राहील. आर्थिक गुंतवणुकीकरिता योग्य दिवस आहे.

WhatsApp channel