आज शुक्रवार १९ एप्रिल रोजी, चैत्र मासातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी आहे आणि ही तिथी कामदा एकादशी व्रत म्हणून ओळखली जाते. तसेच, चंद्र सूर्याच्या सिंह राशीत प्रवेश करणार आहे. त्याच वेळी, मेष राशीमध्ये सूर्य, बुध आणि गुरूचा संयोग देखील तयार होत आहे. कामदा एकादशीच्या दिवशी ग्रह-नक्षत्रांमध्ये वृद्धी योग, ध्रुव योग, रवि योग आणि मघा नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने दिवसाचे महत्त्व अधिकच वाढले आहे. आज कोणत्या ५ राशींना नशीबाची साथ मिळणार आहे, जाणून घ्या.
आज किर्ती प्रसिद्धीचे योग येतील. धंदा नफ्यात राहील. नवीन नोकरी लागू शकते. वैवाहिक जीवनात सामंजस्य राहील. विद्यार्थ्यांना एखाद्या स्पर्धेत चांगले यश मिळू शकते. प्रियजनांची गाठभेट होईल. उद्योग व्यापारात कार्यक्षेत्र विस्तारेल. शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांना लाभ होतील. आत्मविश्वास वाढल्याने कठीण पेचप्रसंगावर सहज मात कराल. व्यापार रोजगार चांगला चालेल. मुलांसंबंधातील कामात प्रगती होईल.
आज सर्व खूष राहतील. जोडीदारामुळे तुमचा फायदा होऊ शकतो. नोकरी व्यवसायात अचानक फायदा होईल. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. प्रभावशाली व्यक्तींच्या गाठीभेठी होतील. आत्मविश्वासात वाढ झाल्याने कोणतेही काम सहजतेने करु शकाल. वाद विवाद टाळावेत. प्रवासातून आर्थिक लाभ होतील. मौजमजा करण्याकडे कल राहील. धार्मिकतेकडे जास्त कल राहील.
आज व्यापारात व्यवसाय फायदेशीर राहील. महत्वकांक्षा पूर्ण होतील. यश मिळवल्याने उत्साह वाढेल. प्रतिष्ठित व्यक्तींच्या भेटी घडतील. ज्यांच्या भविष्यात फायदा होणार आहे. आपल्या कार्यक्षेत्रात प्रगतीकारक दिनमान आहे. मुलांकडून समाधान लाभेल. आज आर्थिक लाभ होतील. नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन केली जाईल. त्याचा फायदा कामासाठी होईल.
आज इतराच्या सहयोगाने कामात यश येईल. आपले विचार योग्य ठेवा. नोकरी रोजगारात प्रसन्न वातावरण असल्यामुळे आपण केलेले प्रयत्न यशस्वी होतील. मित्र आणि शुभचिंतक याच्या माध्यमातून आपल्या समस्या दूर होण्यास मदत होईल. कौटुंबिक वातावरण आनंदमय राहील. नोकरीत प्रगती होण्याचे संकेत मिळतील. कुटुंबातील सदस्याची प्रगती होईल.
आज आर्थिक आवक चांगली राहील. प्रतिष्ठा वाढल्याने आनंदी राहाल. अधिक प्रयत्न केल्यास जास्तीचे यश मिळू शकेल. संशोधनात्मक कार्य प्रारंभ करण्यास उत्तम दिवस आहे. वरिष्ठांशी सलोख्याचे संबंध प्रस्थापित कराल. व्यापारिक स्पर्धेत विजयी होण्याचे योग आहेत. कुंटुबातील वातावरण आनंददायी आणि सहकार्याचे राहील. कामाचे कौतुक होईल.
संबंधित बातम्या