मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Dhanu Makar kumbh Meen Rashi : धनु राशीच्या लोकांचा यश मिळाल्याने उत्साह वाढेल! वाचा चारही राशींचे भविष्य!

Dhanu Makar kumbh Meen Rashi : धनु राशीच्या लोकांचा यश मिळाल्याने उत्साह वाढेल! वाचा चारही राशींचे भविष्य!

Priyanka Chetan Mali HT Marathi
Apr 19, 2024 08:15 AM IST

Sagittarius, Capricorn, Aquarius, Pisces prediction 19 April 2024 : आज १९ एप्रिल २०२४ रोजी, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी कसा असेल शुक्रवारचा दिवस? वाचा चारही राशींचे राशीभविष्य!

धनु, मकर, कुंभ आणि मीन
धनु, मकर, कुंभ आणि मीन

Dhanu Makar Kumbh Meen Rashi Bhavishya : आज अहोरात्र चंद्र रविशी संयोग करीत आहे. वणिज करणात आणि वृद्धी योगात धनु, मकर, कुंभ व मीन राशीच्या लोकांसाठी कसा असेल आजचा दिवस! वाचा राशीभविष्य!

धनुः 

आज चंद्र अनुकूल असल्याने स्थिती राहणार आहे. नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन केली जाईल. त्याचा फायदा कामासाठी होईल. पैसे मिळाले तरी ठरवलेल्या कारणासाठीच पैसा खर्च कराल. घरामध्ये पाहुण्यांची वर्दळ राहील. तरुणांना नवीन मित्रमंडळी भेटतील. कामाच्या ठिकाणी योग्य तेथे कर्तव्य निभावाल. तुमच्या स्वभावातील वेगळे कंगोरे प्रकर्षाने दिसून येतील. कार्यक्षेत्रात वेळेचा चांगला सदुपयोग करून आपल्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीने कामकाजाला सुरुवात करा. कामकाजामध्ये वाढ होईल. विचारा अंतीच काळजी पूर्वक निर्णय घ्या. व्यापारात व्यवसाय फायदेशीर राहील. महत्वकांक्षा पूर्ण होतील. यश मिळवल्याने उत्साह वाढेल. प्रतिष्ठित व्यक्तींच्या भेटी घडतील. ज्यांच्या भविष्यात फायदा होणार आहे. आपल्या कार्यक्षेत्रात प्रगतीकारक दिनमान आहे. मुलांकडून समाधान लाभेल. आज आर्थिक लाभ होतील.

शुभरंग: पिवळसर, शुभदिशा: ईशान्य, शुभअंकः ०३, ०५.

मकरः 

आज चंद्राचं भ्रमण पाहता तुमच्या स्वभावामुळे लोकांवर प्रभाव पाडाल. राजकारणी लोक आपला मुत्सद्दीपणा दाखवतील. भक्तिमार्गाकडे वळाल. विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष द्यावे. नोकरी व्यवसायात तुमच्या नवीन कल्पनांचे स्वागत होईल. एखादे काम धाडसाने करण्यात तुमचा पुढाकार असेल. इतराच्या सहयोगाने कामात यश येईल. आपले विचार योग्य ठेवा. नोकरी रोजगारात प्रसन्न वातावरण असल्यामुळे आपण केलेले प्रयत्न यशस्वी होतील. मित्र आणि शुभचिंतक याच्या माध्यमातून आपल्या समस्या दूर होण्यास मदत होईल. कौटुंबिक वातावरण आनंदमय राहिल.नोकरीत प्रगती होण्याचे संकेत मिळतील. मोठ्या तसेच प्रतिष्ठित लोकांशी संबंध वाढतील. कुटुंबातील सदस्याची प्रगती होईल. विचारपूर्वक नियोजन करून कार्य करा.

शुभरंग: निळा, शुभदिशा: पश्चिम, शुभअंकः ०१, ०७.

कुंभः 

आज चंद्रबल उत्तम असल्याने व्यवसायात एखादे काम नवीन पद्धतीने कसे करता येईल हे सांगण्याचे धाडस कराल. आर्थिक आवक चांगली राहील. ज्यांचा बोलण्याचा व्यवसाय आहे त्यांना त्यातून बऱ्यापैकी पैसा मिळेल. घरामध्ये सहलीला जाण्याचे बेत ठरतील. तुमच्या बोलण्याची छाप इतरांवर पडेल. समाजात आपली प्रतिष्ठा वाढल्याने आनंदी राहाल. अधिक प्रयत्न केल्यास जास्तीचे यश मिळू शकेल. संशोधनात्मक कार्य प्रारंभ करण्यास उत्तम दिवस आहे. वरिष्ठांशी सलोख्याचे संबंध प्रस्थापित कराल. व्यापारिक स्पर्धेत विजयी होण्याचे योग आहेत. कुंटुबातील वातावरण आनंददायी आणि सहकार्याचे राहील. जोडीदाराची मर्जी सांभाळावी लागणार आहे. कुटुंबातील वरिष्ठ सदस्यांकडून आपल्या कामाचे कौतुक होईल. वातावरण उत्साहवर्धक राहील.

शुभरंग: जांभळा, शुभदिशा: नैऋत्य, शुभअंकः ०४, ०८.

मीनः 

आज चंद्र गुरू नवमपंचम योगात सामाजिक क्षेत्रात राजकारणात असलेल्या व्यक्तींना समाजाच्या खालच्या थरापर्यंत पोचावे लागेल. घरात सर्वांनी शिस्त पाळावी असं वाटेल परंतु त्याची सुरुवात प्रथम तुमच्या पासून करा. नोकरीमध्ये कोणावरही अवलंबून राहू नये. स्वत:ची कामे स्वतः करावीत. प्रेमप्रकरणात घरच्या विरोधाला तोंड द्यावे लागेल. रोजगारात विपरित प्रसंग घडतील. आर्थिक टंचाई निर्माण होतील. मनात नैराश्य निर्माण होईल. अविचारी निर्णय घेतल्यास नुकसान होऊ शकते. विचार पूर्वक निर्णय घ्या. व्यापारात विनम्रतेने आणि संयमाने कामे करण्याचा प्रयत्न करा. कमाईपेक्षा खर्च जास्त करू नका. येणाऱ्या खर्चामुळे चिंतीत राहाल. खर्चामध्ये वाढ होईल. गुप्तशत्रुपासुन त्रास संभवतो. आरोग्याची काळजी घ्या. वाहन सावकाश सांभाळुन चालवा. अपघात भय संभवते. कुटुंबातील खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे.

शुभरंगः पिवळा, शुभदिशा: ईशान्य, शुभअंकः ०३, ०९.

WhatsApp channel