मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  lucky zodiac signs : प्रवासातून लाभ होईल, गुंतवणूक फायदेशीर ठरेल; या ५ राशींचे भाग्य चमकेल

lucky zodiac signs : प्रवासातून लाभ होईल, गुंतवणूक फायदेशीर ठरेल; या ५ राशींचे भाग्य चमकेल

Priyanka Chetan Mali HT Marathi
Apr 18, 2024 03:18 PM IST

Lucky Rashi Bhavishya 18 April 2024 : आज १८ एप्रिल २०२४ गुरुवार रोजी, गंड योगात चैत्र शुक्ल दशमीचा दिवस आहे, शुभ मुहूर्त व योगात या ५ राशींना आज आनंदाची बातमी मिळेल.

लकी राशीभविष्य १८ एप्रिल २०२४
लकी राशीभविष्य १८ एप्रिल २०२४

आज गुरुवार १८ एप्रिल रोजी, चंद्र कर्क राशीनंतर सिंह राशीत जाणार आहे. तसेच आज चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील दशमी तिथी असून या दिवशी वृद्धी योग, रवियोग आणि आश्लेषा नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने आजच्या दिवसाचे महत्त्व वाढले आहे. आज कोणत्या ५ राशींना नशीबाची साथ मिळणार आहे, जाणून घ्या.

मिथुन: 

आज बुद्धीच्या जोरावर अनेक कामे मार्गी लागतील. मर्दानी खेळ खेळणाऱ्यांना चांगले ग्रहमान आहेत. कामात यश मिळण्याचे योग आहेत. जास्त फायदा मिळण्याच्या दृष्टीने केलेले प्रयत्न फायदेशीर राहतील. नोकरीत कामाप्रती सजग राहा. मित्रपरीवारांकडून उत्तम सहकार्य लाभेल. कुटुंबात धार्मिक कार्य घडेल. प्रवासातून लाभ होईल. 

तूळ: 

आज घर सजवण्याचे स्वप्न साकार होईल. धंद्यात वाढ होईल. कष्टाच्या मानाने लाभ कमी मिळेल. रोजगारात तुमची प्रगती होईल. आपल्या कार्यक्षेत्रात उत्तम प्रदर्शन कराल. व्यवसायात वाढ होईल. विद्यार्थांना नवनवीन क्षेत्रात यश संपादनाची संधी मिळेल. अधिक लाभ होईल. भागीदारासोबत व्यवसाय प्रारंभ करण्यासाठी उत्तम दिवस आहे. अल्प मुदतीची गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे. तुमची पदोन्नती व प्रगती होईल.

वृश्चिक: 

आज कार्यक्षेत्रात एक वेगळाच ठसा उमटवाल. जोडीदाराची साथ चांगली मिळेल. नवीन घर स्थावर खरेदीचे योग येऊ शकतात. व्यवसायात मनाप्रमाणे कामे मिळतील. व्यावसायिक किवा खाजगी कामासाठी प्रवास घडेल. अनुकुल फळ प्राप्त होतील. नोकरीत योग्य मान सन्मान मिळेल. वाहन घर खरेदी करता योग आहे. वडिलोपार्जित इस्टेटीतून लाभ होईल. व्यवसायातील यश मिळाल्याने आनंदी राहाल. 

धनु: 

आज मनःशांती मिळेल. प्रेमप्रकरणात यश मिळेल. नोकरीत आत्मविश्वास द्विगुणित होईल. उद्योग व्यापारात अर्थिक स्तोत्र निर्माण होतील. इच्छित फळ मिळणार आहे. कुटूंबात स्नेह वाढेल. कुटुंबातून आपल्या कार्यास प्रोत्साहन मिळेल. आर्थिक व्यवहार करण्यास उपयुक्त दिवस आहे. आनंदाची बातमी मिळेल. 

मीनः 

आज काम करण्यास उत्साह येईल. धनप्राप्तीची शक्यता राहील. संशोधन क्षेत्रात प्रगती कराल. आकस्मिक धनलाभाचा योग आहे. व्यापार रोजगारात अपेक्षेप्रमाणे यश मिळेल. जिवनाचा मनसोक्त आनंद घ्याल. कुटूंबातील सदस्याचे आपल्या विषयी चांगले मत असेल. कामे करताना वेळेचे नियोजन कराल. कामाच्या ठिकाणी कौतूक केले जाईल. शुभकार्यात सामील व्हाल. मानसन्मान मिळेल. यश मिळाल्याने मन प्रसन्न राहील. 

WhatsApp channel