श्रीराम नवमी नंतर चैत्र पौर्णिमा आणि त्यादिवशी असणारी हनुमान जयंती उत्सव साजरा करण्यासाठी भाविक आतुर असतात. हा हनुमानाचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी भक्त बजरंगबलीचा उपवास करतात. यावेळी २३ एप्रिलला हनुमान जयंती साजरी केली जाणार आहे.
विशेष म्हणजे हनुमान जयंती मंगळवारी येत आहे. मंगळवार हा हनुमानाला समर्पित आहे. त्यांची जयंती या दिवशी साजरी होत असल्याने या दिवसाचे महत्त्व वाढले आहे. यासह हनुमान जयंतीच्या दिवशी सिद्ध योगाचा शुभ संयोग निर्माण होत आहे.
या दिवशी मीन राशीतील ग्रहांच्या संयोगाने पंचग्रही योगही निर्माण होत असून बुधादित्य राजयोगासोबतच शनि राजयोगाचीही निर्मिती होत आहे. या सर्व शुभ योग-संयोगामुळे काही राशींवर बजरंगबलीची खास कृपा होणार आहे. चला जाणून घेऊया या भाग्यशाली राशींबद्दल.
मेष :
हनुमान जयंतीच्या दिवशी मेष राशीच्या लोकांना हनुमानाचा आशीर्वाद मिळेल. त्यांची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होईल. या राशीच्या लोकांना व्यवसायात अपेक्षित यश मिळेल. बजरंगबलीच्या आशीर्वादाने तुम्ही तुमच्या करिअरमध्ये खूप प्रगती कराल. जमीन आणि मालमत्तेशी संबंधित कोणतीही समस्या सोडवली जाईल ज्यामुळे तुम्हाला फायदा होईल.
मिथुन:
मिथुन राशीच्या लोकांना हनुमानाचा आशीर्वाद मिळेल. तुम्हाला प्रत्येक कामात अपेक्षित यश मिळेल. तुमचे भाग्य वाढेल. या राशीच्या लोकांना तणावापासून मुक्ती मिळेल. तुम्ही तुमच्या करिअरमध्ये नवीन उंची गाठाल. तुमचा आत्मविश्वास वाढेल.
वृश्चिक :
हनुमान जयंतीला केलेला योग वृश्चिक राशीसाठी खूप फायदेशीर मानला जातो. व्यवसायात चांगला फायदा होईल. भागीदारीत काम करणाऱ्या लोकांना खूप फायदा होईल. करिअर संदर्भात चांगली बातमी मिळू शकते.