Today Lucky Zodiacs : घर, वाहन खरेदी कराल, कलाकारांसाठी आजचा दिवस मानप्रतिष्ठा वाढवणारा आहे-everyday some zodiac signs have a good fortune ,राशिभविष्य बातम्या
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Today Lucky Zodiacs : घर, वाहन खरेदी कराल, कलाकारांसाठी आजचा दिवस मानप्रतिष्ठा वाढवणारा आहे

Today Lucky Zodiacs : घर, वाहन खरेदी कराल, कलाकारांसाठी आजचा दिवस मानप्रतिष्ठा वाढवणारा आहे

Aug 18, 2023 07:18 AM IST

Today Lucky Zodiac Signs 18 August 2023 : वैदिक ज्योतिष शास्त्रात एकण १२ राशींचं वर्णन केलं आहे.प्रत्येक राशीचा स्वामी एक ग्रह आहे.कुंडलीचे मूल्यमापन ग्रह आणि नक्षत्रांच्या हालचालींवरुन केलं जातं.

आजच्या नशीबवान राशी
आजच्या नशीबवान राशी (Pixabay)

मेष रास 

आज नोकरीत समाधानकारक वातावरण लाभेल. प्रमोशन बढती पदोन्नतीचे योग आहे. वरिष्ठ मंडळी आपल्या कामावर समाधानी असतील. राजकीय, सामाजिक, कला क्षेत्रातील व्यक्तींना शुभ दिनमान आहे. सरकारी योजना अमलात आणल्या जातील. कलाकाराचा मान-सन्मान वाढेल. व्यापारात आर्थिक लाभ होतील.जुनी येणी येतील. कर्जप्रकरण मंजूर होतील. प्रवासातून लाभाचा दिवस आहे. प्रकृती स्थिर राहील.

शुभरंग: केसरी

कर्क रास 

आज मनस्वास्थ उत्तम राहील. भाग्यकारक घटना घडतील. नोकरीत अतिरिक्त कामाची जबाबदारी मिळेल.बढतीची संधी आहे.आप्तेष्ट मित्रपरीवारांकडून सहकार्य लाभेल. कौटुंबिक जीवन आनंदी राहील. प्रेमप्रकरणात यश लाभेल. संततीविषयी चिंता मिटेल. कोर्टकचेरीची प्रकरणं असतील तर निकाल आपल्या बाजूने लागेल. जमीन खरेदी-विक्रीतून अधिक लाभ होईल. शिक्षक वर्गाचा मान-सम्मान वाढेल. आजचे दिनमान सफलतादायक आहे. मानधनात वाढ होईल. मानसन्मान मिळेल.

शुभरंगः भगवा

तूळ रास 

आज मनात उर्जा आणि सकारात्मकता वाढेल. वाहन घर खरेदीसाठी शुभ दिवस आहे. आर्थिक सहकार्य लाभेल. प्रेमसंबंधामध्ये जोडीदाराबद्दल प्रेमभावना वाढेल. नोकरवर्गाकरीता आनंदाची बातमी मिळेल. कुटुंबातील वातावरण उत्साहवर्धक व आनंदायक राहील. व्यापारीवर्गाकरीता आर्थिक दृष्टीकोनातून आजचा दिवस उत्तम स्वरूपाचा आहे. धनवृद्धी होईल. विरोधकावर मात कराल. संततीकडून चांगली बातमी मिळेल. ओळखीच्या लोकांकडून फायदा होईल.

शुभरंग: सफेद

मीन रास 

आज नोकरीत आपले कर्तुत्व सिद्ध कराल. जीवनात नवीन संधी निर्माण होतील. व्यापारिक स्पर्धेत यश मिळेल. व्यवसायात किंवा रोजगारात मोठे परिवर्तन घडून येण्याची शक्यता आहे. लोकप्रियता वाढणार आहे. शासनाकडून पैसा किंवा सन्मान मिळेल. पत्नीकडून सहकार्य लाभणार आहे. चांगल्या बातम्या ऐकण्यास मिळतील. चातुर्याने काम केले तर आजचा दिवस शुभ आहे. आर्थिकदृष्या अनेक मोठे प्रश्न हातावेगळे करू शकाल. प्रवासातून लाभ होईल. परदेशगमनाची शक्यता आहे. मानसिक संतुलन सांभाळा.

शुभरंग: पिवळा

 

विभाग