मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  VIDEO : जनावरांच्या गोठ्यात शाळा की शाळेत गोठा; सरकारी शाळेची स्थिती, विद्यार्थी त्रस्त

VIDEO : जनावरांच्या गोठ्यात शाळा की शाळेत गोठा; सरकारी शाळेची स्थिती, विद्यार्थी त्रस्त

Aug 09, 2022, 11:56 PMIST

शाळेत जनावरांचा गोठा की, जनावरांच्या गोठ्यात शाळा.. हे चित्र शिक्षणाच्या मंदिराची दुरवस्था जाहीर करते.. प्रशासन लाख दावे करो मात्र फोटो खरी कहाणी सांगतात. हे प्रकरण मध्य प्रदेश राज्यातील छतरपूर येथील आहे. येथील दृष्य पाहून हैरान व्हाल की, शाळेतच जनावरांचा गोठा केला आहे. शाळेत हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच विद्यार्थी आहेत. ही शाळा छतरपूर जिल्ह्याच्या ठिकाणापासून ७० किलोमीटर दूर आहे. शाळेच्या अंगणात गोठा आहे तर वर्गात जनावरांचा चारा ठेवला आहे. यामुळे विद्यार्थी त्रस्त आहेत.