मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Live News Updates 12 August 2023 : दिल्ली सेवा विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची स्वाक्षरी
Live News Updates 12 August 2023 (HT)

Live News Updates 12 August 2023 : दिल्ली सेवा विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची स्वाक्षरी

Aug 12, 2023, 10:29 PMIST

Live News Updates 12 August 2023 : पावसाळी अधिवेशनात संसदेत संमत झालेल्या दिल्ली सेवा विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वाक्षरी केली आहे. त्यामुळं आता या बिलाचं कायद्यात रुपांतर झालं आहे.

Aug 12, 2023, 10:29 PMIST

शरद पवार-अजित पवार भेटीमुळे जनता आणि कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम - अंबादास दानवे

शरद पवार व अजित पवार बैठक झाली हे मीडियामधून समजते आहे. यामधून एक जनतेच्या मनात संभ्रम निर्माण होत आहे. परंतू मागच्या काळात शरद पवार यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, भाजपबरोबर कधी जाणार नाही. पण, अजित पवार आणि शरद पवार यांच्या अशा भेटीमुळे जनतेमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होतो, हे मात्र नक्की आहे, असं अंबादास दानवे म्हणाले. 

Aug 12, 2023, 07:23 PMIST

महावितरणच्या गांधेली उपकेंद्राचा गौरव

विद्युत सुरक्षेसाठी उल्लेखनीय कामगिरीबद्दल महावितरणच्या औरंगाबाद परिमंडलातील ३३ केव्ही गांधेली उपकेंद्राचा विद्युत निरीक्षण विभागाने प्रशस्तीपत्र देऊन गौरव केला आहे.

राज्य शासनाच्या विद्युत निरीक्षक कार्यालयाने २०२३-२४ या वर्षासाठी गांधेली उपकेंद्राचे ‍ ‍निरीक्षण केले. यावेळी विद्युत अधिनियम-२००३ व केंद्रीय विद्युत प्राधिकरण (सुरक्षा व विद्युतपुरवठ्यासंबंधीचे उपाय) विनियम-२०२३ मधील तरतुदीचे पालन उपकेंद्राचे झालेले आहे. उपकेंद्रातील विद्युत संच मांडणी सुस्थितीत व सुरक्षित असल्याचे तसेच विविध नोंदवह्या अद्ययावत असल्याचे आढळले. महावितरणकडून उपकेंद्रात उल्लेखनीय काम झाले असून, शासनाचे शून्य अपघात धोरण आपण अंगीकृत केले असल्याचे ‍निरीक्षण नोंदवण्यात आले.

Aug 12, 2023, 04:27 PMIST

महावितरण कर्मचाऱ्यांचे राज्य नाट्य स्पर्धेत यश

६१  व्या महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य स्पर्धेत महावितरणच्या औरंगाबाद परिमंडलातील कर्मचाऱ्यांच्या ‘अचानक’ या नाटकास सर्वोत्कृष्ट नाट्य निर्मितीच्या ‍द्वितीय पुरस्कारासह ‍विविध पारितोषिकांनी गौरवण्यात आले. लोकजागृती बहुउद्देशीय संस्था, वाहेगाव (देमणी) (ता.औरंगाबाद) या संस्थेतर्फे सादर, श्रावण कोळनूरकर दिग्दर्शित या नाटकास सर्वोत्कृष्ट नाट्यनिर्मिती द्वितीय, दिग्दर्शन द्वितीय, नेपथ्य द्वितीय, पुरुष अभिनय रौप्यपदक आणि स्री अभिनय गुणवत्ता प्रमाणपत्र पुरस्कार देण्यात आले. सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे नुकतेच तापडिया नाट्यमंदिरात झालेल्या खास समारंभात प्राथमिक फेरीचे पारितोषिक वितरण करण्यात आले.

Aug 12, 2023, 12:52 PMIST

Ajit Pawar In Metro : अजित पवार यांनी केला मेट्रोप्रवास, प्रवाशांशीही मारल्या गप्पा

Ajit Pawar In Pune Metro : पुण्यातील चांदणी चौकातील नव्या पुलाचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं आहे. त्यापूर्वी कार्यक्रमाला जाताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रुबी हॉल क्लिनिक ते वनाजपर्यंत मेट्रोने प्रवास केला. मेट्रोत प्रवास करत असताना अजित पवार यांनी प्रवाशांसोबत चांगल्याच गप्पा मारल्याचं दिसून आलं.

Aug 12, 2023, 12:52 PMIST

Delhi Services Bill : दिल्ली सेवा विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची स्वाक्षरी

Delhi Services Bill : पावसाळी अधिवेशनात संसदेत संमत झालेल्या दिल्ली सेवा विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वाक्षरी केली आहे. त्यामुळं आता या बिलाचं कायद्यात रुपांतर झालं आहे. केंद्रातील मोदी सरकारने आणलेल्या या नव्या कायद्यावरून दिल्लीत आम आदमी पार्टी विरुद्ध भाजप असा संघर्ष पेटण्याची शक्यता आहे.

Aug 12, 2023, 08:37 AMIST

Fire In Vegetable Market : कोल्हापुरात भाजी मार्केटमध्ये भीषण आग; लाखो रुपयांचं साहित्य जळून खाक

Vegetable Market Fire : कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी शहरातील भाजी मार्केटमध्ये भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत कोणतीही जीवीतहानी झाली नसून लाखोंच्या संपत्तीचं नुकसान झालं आहे. त्यानंतर आता अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग संपूर्णपणे विझवण्यात आली आहे. त्यानंतर आता परिसरात कूलिंगचं काम हाती घेण्यात आलं आहे.

Aug 12, 2023, 06:11 AMIST

Sana Khan Murder Case : भाजप नेत्या सना खान यांच्या मारेकऱ्याला पोलिसांकडून अटक

Sana Khan Murder Case : नागपुरातील भाजपाच्या नेत्या सना खान यांची मध्यप्रदेशातील जबलपूर शहरात हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यानंतर आता नागपूर पोलिसांनी सना खान यांचा मृतदेह ताब्यात घेतला असून आरोपी अमित साहू याला अटक करत त्याची चौकशी सुरू केली आहे.

Aug 12, 2023, 06:10 AMIST

Medha Kulkarni : मेधा कुलकर्णींचा नाव न घेता चंद्रकांत पाटलांवर हल्ला, म्हणाल्या...

Medha Kulkarni Pune : पुण्यातील चांदणी चौकातील नवीन उड्डाणपुलाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पार पडणार आहे. परंतु कार्यक्रमपत्रिकेत नाव नसल्याने माजी आमदार मेधा कुलकर्णी नाराज असल्याचं बोललं जात आहे. चांदणी चौकातील पुलाच्या कामासाठी आपणच प्रयत्न केले होते, परंतु कोथरुडचे आधुनिक शिल्पकार असलेल्या चंद्रकांत पाटलांना याचा विसर पडल्याचं सांगत मेधा कुलकर्णी यांनी भाजपला घरचा आहेर दिला आहे.

Aug 12, 2023, 06:10 AMIST

Raghav Chadha Suspended : खासदार राघव चढ्ढा राज्यसभेतून निलंबित

Raghav Chadha Suspended : आम आदमी पार्टीचे खासदार राघव चढ्ढा यांना राज्यसभेतून निलंबित करण्यात आलं आहे. बनावट सह्यांच्या प्रकरणात चढ्ढा यांना निलंबित करण्यात आलं असून सभागृहात त्यांचं वर्तन निषेधार्ह असल्याची तक्रार भाजपा खासदारांनी सभापतींकडे केली होती. दिल्ली सेवा विधेयकावर बोलताना चढ्ढा यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टीका केली होती. त्यामुळं आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

Aug 12, 2023, 06:08 AMIST

AAP MP Suspended : अधिवेशनात आपचे तीन खासदार निलंबित

AAP MP Suspended : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मणिपूर तसेच दिल्ली सेवा विधेयकावर चर्चेवेळी गोंधळ घातल्याच्या कारणावरून आम आदमी पार्टीच्या तीन खासदारांना निलंबित करण्यात आलं आहे. त्यात राज्यसभेचे खासदार राघव चढ्ढा, संजय सिंह तर लोकसभेच्या सुशील रिंकू यांचा समावेश आहे.

    शेअर करा