मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Live News Updates 24 January 2023: देवेंद्र फडणवीसांना अटक करण्याची कोणतीही योजना नव्हती
DILIP WALSE PATIL

Live News Updates 24 January 2023: देवेंद्र फडणवीसांना अटक करण्याची कोणतीही योजना नव्हती

Jan 24, 2023, 11:41 PMIST

महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना अटक करण्याची सरकारने कोणतीही योजना आखली नव्हती असं स्पष्टीकरण राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केलं आहे.

Jan 24, 2023, 12:44 PMIST

Samvidhan Gallery : यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आज संविधान दालनाचे उद्घाटन

मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आज संविधान दालनाचा शुभारंभ होणार आहे. या दालनाचं उद्घाटन दुपारी ३ वाजता चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते होणार आहे. संविधानावरील व्याख्यानं, संविधान प्रश्नमंजुषा कार्यशाळा व शिबिरं अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन भविष्यात या दालनात करण्यात येणार आहे.

Jan 24, 2023, 09:23 AMIST

Market opening :  सेन्सेक्स निफ्टीची सुरुवात चांगली, ५० अंशांची वाढ 

Market opening : आशियाई बाजारपेठेतून मिळालेल्या सकारात्मक संकेतांमुळे आज मुंबई शेअर बाजाराची सुरुवात चांगली झाली. सेन्सेक्स निफ्टीमध्ये ५० अंशांची वाढ नोंदवण्यात आली. सेन्सेक्स ६१,१०० च्या अंशपातळीवर खुला झाला. तर निफ्टी १८,१८३ च्या अंश पातळीवर खुला झाला. आज दिवसभरात कोलगेट पामालिव्ह, मारुती सुझूकी, एचडीएफसी या कंपन्यांच्या तिमाही निकालावर शेअर बाजाराचे लक्ष राहणार आहे.

Jan 24, 2023, 09:04 AMIST

MPSC : डॉ. सतीश देशपांडे, डॉ. अभय वाघ यांची एमपीएससीच्या सदस्यपदी नियुक्ती

राज्य शासनाकडून महाराष्ट्र लोकसेवा आयोगातील (एमपीएससी) सदस्यांच्या रिक्त जागांवर डॉ. सतीश देशपांडे, डॉ. अभय वाघ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Jan 24, 2023, 08:01 AMIST

Dagadusheth Ganpati : सुवर्णपाळण्यात होणार 'दगडूशेठ' गणपती मंदिरात गणेश जन्म सोहळा

पुणे : स्वस्तिक, ओम यांसारखी शुभचिन्हे आणि गजमुखाच्या नक्षींनी सजलेल्या सुवर्णपाळण्यात यंदा श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात श्री गणेश जन्म सोहळा होणार आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळच्यावतीने गणेश जन्म सोहळा माघ शुद्ध चतुर्थी म्हणजेच बुधवार, दिनांक २५ जानेवारी रोजी मंदिरात आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण यांनी दिली.

Jan 24, 2023, 06:19 AMIST

Rahul Gandhi : कॉँग्रेसनेते राहुल गांधी आज माध्यमांशी साधणार संवाद 

भारत जोडो यात्रेत राहुल गांधी यांची पत्रकार परिषद होआर आहे. आज दुपारी १  वाजता जम्मू-काश्मीरमधील इज्जर कोटलीमध्ये ही पत्रकार परिषद होणार आहे.

Jan 24, 2023, 06:18 AMIST

Rakhi Sawant : राखी सावंतच्या याचिकेवर पुन्हा सुनावणी

अभिनेत्री राखी सावंत हिने दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज हायकोर्टात पुन्हा सुनावणी होणार आहे. 

Jan 24, 2023, 06:17 AMIST

Patrachwal Scam : मुंबईतील गोरेगाव पत्राचाळ घोटाळा प्रकरणी आरोप निश्चितीची प्रक्रिया होणार आज 

गोरेगाव पत्राचाळ घोटाळा प्रकरणी आरोप निश्चितीची प्रक्रियाआज होणार आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांच्यासह या प्रकरणातील सहआरोपी प्रवीण राऊत, वाधवान ब्रदर्स यांच्याविरोधात आरोप निश्चित होणार आहेत. 

Jan 24, 2023, 06:16 AMIST

CM Eknath Shinde, DCM Devendra Fadnavis : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचा आज दिल्ली दौरा, अमित शहा यांची घेणार भेट

CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. केंद्रिय सहकार मंत्री अमित शहांसोबत या दोघांची बैठक होणार आहे. यात ते राज्यातील प्रश्नांवर चर्चा करणार आहेत.

    शेअर करा