मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  World Kidney Day: हे ५ फूड आहेत तुमच्या किडनीचे बेस्ट फ्रेंड, आजच करा आहारात समावेश

World Kidney Day: हे ५ फूड आहेत तुमच्या किडनीचे बेस्ट फ्रेंड, आजच करा आहारात समावेश

Mar 09, 2023, 11:08 AM IST

    • Health Care Tips: शरीराच्या सुरळीत कामकाजासाठी किडनी हा एक आवश्यक अवयव आहे. त्यामुळे दररोज त्याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. किडनीच्या उत्तम आरोग्यासाठी तुम्ही आहारात हे ५ गोष्टींचा समावेश करु शकता.
किडनीच्या आरोग्यासाठी बेस्ट फूड

Health Care Tips: शरीराच्या सुरळीत कामकाजासाठी किडनी हा एक आवश्यक अवयव आहे. त्यामुळे दररोज त्याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. किडनीच्या उत्तम आरोग्यासाठी तुम्ही आहारात हे ५ गोष्टींचा समावेश करु शकता.

    • Health Care Tips: शरीराच्या सुरळीत कामकाजासाठी किडनी हा एक आवश्यक अवयव आहे. त्यामुळे दररोज त्याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. किडनीच्या उत्तम आरोग्यासाठी तुम्ही आहारात हे ५ गोष्टींचा समावेश करु शकता.

Best Food for Kidney: किडनीचा आजार ही जगातील १०% लोकसंख्येला प्रभावित करणारी एक सामान्य समस्या आहे. किडनी हे लहान पण शक्तिशाली अवयव आहेत, जे शरीरात अनेक महत्त्वपूर्ण कार्ये करतात. किडनी टाकाऊ पदार्थ फिल्टर करण्यासाठी आणि रक्तदाब नियंत्रित करणारे हार्मोन्स सोडण्यासाठी जबाबदार असतात. याव्यतिरिक्त ते शरीरातील द्रव संतुलित करुन मूत्र तयार करते. किडनीमध्ये सुमारे एक लाख लहान फिल्टर असतात, ज्याला नेफ्रॉन म्हणतात. नेफ्रॉनचे नुकसान झाल्यास ते काम करणे थांबवतात. ठराविक वेळेनंतर, उर्वरित नेफ्रॉन तुमचे रक्त पुरेशा प्रमाणात फिल्टर करू शकत नाहीत. त्यामुळे तब्येत बिघडू लागते. पण असे अनेक पदार्थ आहेत, ज्यांचे सेवन करून तुम्ही किडनीच्या आजारापासून दूर राहू शकता.

ट्रेंडिंग न्यूज

Paneer Bhurji Recipe: लंचसाठी बनवा अमृतसरी पनीर भुर्जी, पराठ्यासोबत टेस्टी लागते ही रेसिपी

International Day of Light: का साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय प्रकाश दिवस? जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

joke of the day : गझल आणि भाषणात काय फरक आहे असं जेव्हा गुरुजी मुलांना विचारतात…

National Dengue Day 2024: राष्ट्रीय डेंग्यू दिन साजरा करण्याचे उद्देश काय? हा आहे या दिवसाचा इतिहास आणि महत्त्व

हे पदार्थ आहेत तुमच्या किडनीचे मित्र

कोबी

ही साधी भाजी अनेक महत्त्वाच्या खनिजांनी समृद्ध आहे, जी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यामध्येके व्हिटॅमिन के, सी आणि बी चांगल्या प्रमाणात असतात. कोबीमध्ये फायबर असते, जे आपली पचनसंस्था निरोगी ठेवते आणि किडनीच्या आजारापासून बचाव करते. त्यामध्ये सोडियमचे प्रमाण खूपच कमी असते, त्यामुळे ते किडनीसाठी योग्य आहे.

जांभूळ

हे अँटी ऑक्सिडंटचे भांडार आहेत. ते चवदार असण्यासोबतच आरोग्यदायी देखील असतात. त्यात सोडियम, पोटॅशियम आणि फॉस्फरसचे प्रमाण कमी असते, त्यामुळे ते किडनीला अनुकूल आहेत. याशिवाय ते रोगप्रतिकारशक्ती वाढवते आणि हृदय मजबूत करण्यास मदत करते.

लसूण

लसणाचा वापर भारतीय जेवणात नक्कीच केला जातो. चव वाढवण्यासोबतच हे अनेक औषधी गुणधर्मांनी समृद्ध आहे. लसणामध्ये मॅंगनीज, व्हिटॅमिन सी, बी ६ आणि इतर अँटी इंफ्लामेटरी गुणधर्म असतात. याव्यतिरिक्त त्यात सोडियम, पोटॅशियम आणि फॉस्फरसचे प्रमाण अत्यंत कमी आहे, जे किडनी रोग असलेल्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते.

लाल द्राक्षे

लाल द्राक्षे दिसायला सुंदर तर असतातच, पण आरोग्यासाठीही खूप पौष्टिक असतात. त्यात व्हिटॅमिन-सी आणि अँटी ऑक्सिडंट्स चांगल्या प्रमाणात असतात. याव्यतिरिक्त लाल द्राक्षे किडनीसाठी अनुकूल फळ आहेत कारण त्यात पोटॅशियमचे प्रमाण नगण्य असते.

अननस

हे खास फळ तुमची प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करू शकते. पचनसंस्थेसाठीही अननस फायदेशीर आहे. त्यात पोटॅशियम कमी आणि फायबर जास्त असल्यामुळे ते किडनीसाठी उत्तम फळ आहे. किडनीच्या आजाराने त्रस्त असलेल्यांनी याचे सेवन करावे. कारण त्यात ब्रोमेलेन असते, जे फायदेशीर मानले जाते.

किडनीचा त्रास असेल घ्या या गोष्टींची काळजी

सोडियम

सोडियम किडनीसाठी चांगले मानले जात नाही. हे अनेक पदार्थांमध्ये आढळते आणि ते टेबल सॉल्टचा एक प्रमुख घटक आहे. म्हणूनच, जर तुम्हाला किडनीचा त्रास असेल तर दररोज २००० मिलीग्रामपेक्षा कमी सोडियम खा.

पोटॅशियम

पोटॅशियम शरीरात अनेक महत्त्वाची भूमिका बजावते. पण किडनीचा आजार असलेल्या लोकांना पोटॅशियम कमी वापरण्याचा सल्ला दिला जातो. कारण यामुळे शरीरात रक्तदाब वाढतो.

फॉस्फरस

फॉस्फरस उच्च पातळीचे कारण बनते आणि शरीराला हानी पोहोचवू शकते. म्हणूनच आहारात फॉस्फरस कमी खावे. किडनीचा आजार असलेल्या रुग्णांनी दररोज फक्त ८०० ते १००० मिलीग्राम फॉस्फरस खावे.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

पुढील बातम्या