मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Photo Gallery: मुंबईच्या शिरपेचात भव्य अशा ‘नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्रा’चा दिमाखदार तुरा

Photo Gallery: मुंबईच्या शिरपेचात भव्य अशा ‘नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्रा’चा दिमाखदार तुरा

Mar 29, 2023, 07:34 PMIST

मुंबई शहरात कला व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते. विविध कलांच्या सादरीकरणासाठी वांद्रे-कुर्ला कॉम्पलेक्स परिसरात नव्याने उभारण्यात आलेलं ‘नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्रा’ची दिमाखदार इमारत मुंबईच्या कला वैभवात भर घालणारी आहे. (Nita Mukesh Ambani Cultural Centre, Bandra-Kurla Complex, Mumbai)

मुंबई शहरात कला व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते. विविध कलांच्या सादरीकरणासाठी वांद्रे-कुर्ला कॉम्पलेक्स परिसरात नव्याने उभारण्यात आलेलं ‘नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्रा’ची दिमाखदार इमारत मुंबईच्या कला वैभवात भर घालणारी आहे. (Nita Mukesh Ambani Cultural Centre, Bandra-Kurla Complex, Mumbai)
भारतीय कलेचं संवर्धन करण्याच्या हेतुने मुंबईत वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स परिसरात रिलायन्स उद्योग समुहातर्फे नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्र (NMACC) उभारण्यात आले आहे. भारतीय आणि जागतिक कला प्रदर्शनासाठी उभारण्यात आलेली ही चार मजली इमारत मुंबई शहरातील कलाप्रेमींसाठी एक खजिना खुला होणार आहे.
(1 / 6)
भारतीय कलेचं संवर्धन करण्याच्या हेतुने मुंबईत वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स परिसरात रिलायन्स उद्योग समुहातर्फे नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्र (NMACC) उभारण्यात आले आहे. भारतीय आणि जागतिक कला प्रदर्शनासाठी उभारण्यात आलेली ही चार मजली इमारत मुंबई शहरातील कलाप्रेमींसाठी एक खजिना खुला होणार आहे.(Photo: NMACC)
The Grand Theatre: कला व सांस्कृति केंद्रामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाने प्रगत असे तीन मजली ‘द ग्रँड थिएटर’ उभारण्यात आले आहे. या थिएटरमध्ये दोन हजार आसन क्षमता आहे. थिएटरमध्ये जागतिक दर्जाची इंटिग्रेटेड डॉल्बी अॅटमॉस ध्वनी यंत्रणा तसेच आभासी अकौस्टिक सिस्टीम, कल्पक प्रकाश व्यवस्था बसवण्यात आली आहे. ग्रँड थिएटरमध्ये भाषांतराची सुविधा उपलब्ध असून संपूर्ण थिएटरमध्ये ध्वनी प्रतिबिंब कमी करणाऱ्या विशेष अशा लाकडाचा वापर करण्यात आला आहे.  
(2 / 6)
The Grand Theatre: कला व सांस्कृति केंद्रामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाने प्रगत असे तीन मजली ‘द ग्रँड थिएटर’ उभारण्यात आले आहे. या थिएटरमध्ये दोन हजार आसन क्षमता आहे. थिएटरमध्ये जागतिक दर्जाची इंटिग्रेटेड डॉल्बी अॅटमॉस ध्वनी यंत्रणा तसेच आभासी अकौस्टिक सिस्टीम, कल्पक प्रकाश व्यवस्था बसवण्यात आली आहे. ग्रँड थिएटरमध्ये भाषांतराची सुविधा उपलब्ध असून संपूर्ण थिएटरमध्ये ध्वनी प्रतिबिंब कमी करणाऱ्या विशेष अशा लाकडाचा वापर करण्यात आला आहे.  (Photo: NMACC)
या थिएटरचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे प्रेक्षकांचा रंगमंचावरील दृश्यानुभव अधिक नेत्रदिपक होण्यासाठी दोन्ही बाजुला एकूण १८ डायमंड बॉक्स उभारण्यात आले आहे. एका बॉक्समध्ये ५ प्रेक्षकांना स्वतंत्रपणे बसण्याची सोय केलेली आहे. प्रत्येक बॉक्स शेजारी डायमंड लाउंज उभारण्यात आले आहे. थिएटरच्या छतावर ८,४०० हून अधिक स्वारोवस्की क्रिस्टल दिवे लावण्यात आले असून यातील प्रत्येक दिवा स्वतंत्रपणे हाताळला जातो. त्यामुळे दिव्यांचा प्रभावाने थिएटरच्या छतावर सूर्योदय, सूर्यास्त सारखी आणि इतर दृष्ये साकारता येणार आहे. 
(3 / 6)
या थिएटरचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे प्रेक्षकांचा रंगमंचावरील दृश्यानुभव अधिक नेत्रदिपक होण्यासाठी दोन्ही बाजुला एकूण १८ डायमंड बॉक्स उभारण्यात आले आहे. एका बॉक्समध्ये ५ प्रेक्षकांना स्वतंत्रपणे बसण्याची सोय केलेली आहे. प्रत्येक बॉक्स शेजारी डायमंड लाउंज उभारण्यात आले आहे. थिएटरच्या छतावर ८,४०० हून अधिक स्वारोवस्की क्रिस्टल दिवे लावण्यात आले असून यातील प्रत्येक दिवा स्वतंत्रपणे हाताळला जातो. त्यामुळे दिव्यांचा प्रभावाने थिएटरच्या छतावर सूर्योदय, सूर्यास्त सारखी आणि इतर दृष्ये साकारता येणार आहे. (Photo: NMACC)
नाटक, संगीत, स्टँडअप कॉमेडी, विविध छोटेखानी प्रदर्शने, चित्रिकरण इत्यादींसाठी खासकरून उदयोन्मुख कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे म्हणून ‘क्यूब’ हे फिरते रंगमंच उभारण्यात आले आहे. १२५ आसन क्षमतेचे सभागृह असलेल्या क्यूबमध्ये आसन व्यवस्था फिरती ठेवण्यात आली आहे. नव्या युगातील प्रतिभेचा शोध घेण्याचे एक व्यासपीठ म्हणून याची रचना करण्यात आली आहे. येथे पॅनासॉनिक लेसर प्रोजेक्शन सिस्टीम असून कलेचं सादरीकरण करताना वास्तववादी भास येण्यासाठी येथे इन्फ्रारेड एमिटरयुक्त श्रवण सुविधा बसवण्यात आली आहे. 
(4 / 6)
नाटक, संगीत, स्टँडअप कॉमेडी, विविध छोटेखानी प्रदर्शने, चित्रिकरण इत्यादींसाठी खासकरून उदयोन्मुख कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे म्हणून ‘क्यूब’ हे फिरते रंगमंच उभारण्यात आले आहे. १२५ आसन क्षमतेचे सभागृह असलेल्या क्यूबमध्ये आसन व्यवस्था फिरती ठेवण्यात आली आहे. नव्या युगातील प्रतिभेचा शोध घेण्याचे एक व्यासपीठ म्हणून याची रचना करण्यात आली आहे. येथे पॅनासॉनिक लेसर प्रोजेक्शन सिस्टीम असून कलेचं सादरीकरण करताना वास्तववादी भास येण्यासाठी येथे इन्फ्रारेड एमिटरयुक्त श्रवण सुविधा बसवण्यात आली आहे. (Photo: NMACC)
वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्रामध्ये दृष्य कलेच्या प्रदर्शनासाठी चार मजली आणि तब्बल १६ हजार चौरस फूट जागेवर ‘आर्ट हाउस’ हे भव्य कला दालन उभारण्यात आलं आहे. परिसरातील ‘फाउंटन ऑफ जॉय’ या भव्य कारंजाच्या समोरच हे कला दालन उभारण्यात आलं आहे. ‘कलेसाठी खुले केलेले हे नवीन दालन भारत आणि जगभरातील रसिकांना एकत्र आणेल, त्यांची प्रतिभा जोपासली जाईल आणि प्रेरणा मिळेल, अशी मला आशा आहे.’ अशी आशा नीता अंबानी यांनी व्यक्त केली. 
(5 / 6)
वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्रामध्ये दृष्य कलेच्या प्रदर्शनासाठी चार मजली आणि तब्बल १६ हजार चौरस फूट जागेवर ‘आर्ट हाउस’ हे भव्य कला दालन उभारण्यात आलं आहे. परिसरातील ‘फाउंटन ऑफ जॉय’ या भव्य कारंजाच्या समोरच हे कला दालन उभारण्यात आलं आहे. ‘कलेसाठी खुले केलेले हे नवीन दालन भारत आणि जगभरातील रसिकांना एकत्र आणेल, त्यांची प्रतिभा जोपासली जाईल आणि प्रेरणा मिळेल, अशी मला आशा आहे.’ अशी आशा नीता अंबानी यांनी व्यक्त केली. (Photo: NMACC)
‘भारतीय कलेचं संवर्धन करण्याचं उद्दिष्ट समोर ठेवून रिलायन्सने हे नवे सांस्कृतिक केंद्र उभारले आहे. आमची नवीन वास्तु ही कला प्रतिभा जोपासत कलेला निश्चितच प्रेरणा देईल’, असा विश्वास रिलायन्स फाऊंडेशनच्या संस्थापक आणि अध्यक्षा नीता एम. अंबानी यांनी व्यक्त केला. तर ‘नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्र' ही भव्य वास्तु माझ्या आईच्या कलेच्या प्रेमाचं एक प्रतिक आहे. असे व्यासपीठ तयार करण्याचे स्वप्न आईने नेहमीच पाहिले होते. कला, संस्कृती क्षेत्रातील रसिक प्रेक्षक, कलाकार आणि कलाकृतीचे येथे स्वागत होईल’ अशी प्रतिक्रिया रिलायन्स जिओच्या संचालक ईशा अंबानी यांनी व्यक्त केली.
(6 / 6)
‘भारतीय कलेचं संवर्धन करण्याचं उद्दिष्ट समोर ठेवून रिलायन्सने हे नवे सांस्कृतिक केंद्र उभारले आहे. आमची नवीन वास्तु ही कला प्रतिभा जोपासत कलेला निश्चितच प्रेरणा देईल’, असा विश्वास रिलायन्स फाऊंडेशनच्या संस्थापक आणि अध्यक्षा नीता एम. अंबानी यांनी व्यक्त केला. तर ‘नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्र' ही भव्य वास्तु माझ्या आईच्या कलेच्या प्रेमाचं एक प्रतिक आहे. असे व्यासपीठ तयार करण्याचे स्वप्न आईने नेहमीच पाहिले होते. कला, संस्कृती क्षेत्रातील रसिक प्रेक्षक, कलाकार आणि कलाकृतीचे येथे स्वागत होईल’ अशी प्रतिक्रिया रिलायन्स जिओच्या संचालक ईशा अंबानी यांनी व्यक्त केली.(Photo: NMACC)

    शेअर करा