मराठी बातम्या  /  बिझनेस  /  ICICI बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर आणि त्यांच्या पतीला सीबीआयकडून अटक

ICICI बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर आणि त्यांच्या पतीला सीबीआयकडून अटक

Dec 23, 2022, 10:46 PM IST

    • सीबीआयने शुक्रवारी आयसीआयसीआय बँकेच्या माजी व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांना कर्ज फसवणूक प्रकरणी अटक केली. (CBI arrested Chanda Kochar)
Chanda Kochhar, Former CEO ICICI Bank, arrested by CBI in loan fraud case

सीबीआयने शुक्रवारी आयसीआयसीआय बँकेच्या माजी व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांना कर्ज फसवणूक प्रकरणी अटक केली. (CBI arrested Chanda Kochar)

    • सीबीआयने शुक्रवारी आयसीआयसीआय बँकेच्या माजी व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांना कर्ज फसवणूक प्रकरणी अटक केली. (CBI arrested Chanda Kochar)

सीबीआयने शुक्रवारी आयसीआयसीआय बँकेच्या माजी व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांना कर्ज फसवणूक प्रकरणी अटक केली आहे. चंदा कोचर यांनी बँकेच्या धोरण आणि नियमांच्या विरोधात जाऊन कोट्यवधी रुपयांचे कर्ज दिल्याचा आरोप आहे. (CBI arrested Chanda Kochar and her husband Deepak Kochhar)

ट्रेंडिंग न्यूज

TCS CEO Salary : भारतातील सर्वात मोठी IT कंपनी TCS च्या सीईओचा दर महिन्याचा पगार माहितीय का? वाचून व्हाल थक्क!

Business Ideas : उद्योग क्षेत्रात ‘जो दिखता है वोही बिकता है...’ हेच सूत्र चालतं…

Akshaya Tritiya Investment : फक्त सोनेच नाही, अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर ही गुंतवणूकही ठरते शुभ

Bank News : 'या' बँकेत तुमचं खातं असेल, पण बँक बॅलन्स नसेल तर एक महिन्यानंतर खातं थेट बंद होणार

चंदा कोचर या बँकेच्या सीईओ असताना २६ ऑगस्ट २००९ रोजी उद्योगपती वेणुगोपाल धूत यांच्या मालकीच्या व्हिडिओकॉन इंटरनॅशनल इलेक्ट्रॉनिक्सला ३०० कोटी रुपये आणि ३१ ऑक्टोबर २०११ रोजी व्हिडिओकॉन इंडस्ट्रीज लिमिटेडला ७५० कोटी रुपयांचे कर्ज वितरण मंजुर केले होते. ७ सप्टेंबर २००९ रोजी कर्ज मंजुर झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे ८ सप्टेंबर २००९ रोजी एनआरएल या कंपनीच्या खात्यात ६४ कोटी रुपये जमा करण्यात आले होते. एनआरएल ही कंपनी चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर आणि वेणुगोपाल धूत यांनी स्थापन केली होती. मुळात व्हिडिओकॉन कंपनीला बँकेंला देण्यात आलेलं कर्ज हे नियमव अटींचे भंग करणारे होते, असं सीबीआयच्या आरोपपत्रात म्हटलं आहे. चंदा कोचर यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत व्हिडिओकॉन कंपनीला कोट्यवधी रुपयांचे कर्ज मंजूर केल्याचा आरोप करण्यात आला होता. या आरोपांनंतर चंदा कोचर यांनी ऑक्टोबर २०१८ मध्ये आयसीआयसीआय बँकेच्या सीईओ आणि एमडी पदाचा राजीनामा दिला होता. या दोघांना शनिवारी सीबीआय कोर्टासमोर हजर करण्यात येणार आहे.

सीबीआय शिवाय ईडीकडूनही या प्रकरणाचा तपास सुरू असून बेहिशेबी मालमत्तेप्रकरणात ईडी तपास करत आहेत. यापूर्वी ईडीकडून दीपक कपूर यांना अटक करण्यात आली होती.