Rahul Gandhi Latest Press conference : काँग्रेस पक्षाची बँक खाती गोठवण्याच्या कारवाईवर खासदार राहुल गांधी तीव्र संताप व्यक्त केला आहे. ‘निवडणुकीचा प्रचार करायलाही आमच्याकडं पैसे नाहीत. हा सरळ सरळ अन्याय आहे. देशातील २० टक्के लोक आमच्या पक्षाला मत देतात. असं असताना कुणीही या कारवाईबद्दल बोलत नाही. न्यायालय, मीडिया किंवा निवडणूक आयोग यावर बोलायला तयार नाही. सगळे गप्प बसून ड्रामा बघत आहेत,’ असा घणाघात राहुल गांधी यांनी केला.