Shiv Sena UBT lok sabha Candidates : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या पक्षाचे चार उमेदवार आज जाहीर केले. जळगावचे खासदार उन्मेष पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश घेतल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ही पत्रकार परिषद उमेदवार जाहीर करण्यासाठी नव्हती. मात्र, पत्रकारांनी उमेदवारांच्या घोषणेबद्दल प्रश्न विचारला आणि उद्धव ठाकरे यांनी थेट नावंच जाहीर करून टाकली.