Devendra Fadnavis in indapur : बारामती लोकसभा मतदारसंघातील इंदापूर तालुक्यात भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज संबोधित केलं. त्यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी हर्षवर्धन पाटील यांच्या नाराजीवर पुन्हा एकदा फुंकर घातली. आजवर इंदापूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपमध्ये टोकाचा संघर्ष झाला. त्यांच्या सोबत काम करताना त्रास होणं साहजिक आहे. हर्षवर्धन पाटलांना त्रास होईल. त्यांच्या कार्यकर्त्यांना त्रास होईल. मात्र मोठ्या ध्येयासाठी आपल्याला सर्वांना सोबत घ्यावं लागेल, असं फडणवीस म्हणाले. बारामतीमध्ये राष्ट्रवादीच्या शरद पवारांच्या पक्षाच्या सुप्रिया सुळे व अजित पवार गटाच्या सुनेत्रा पवार यांच्यात लढत होत आहे.