Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या बाबतीत प्रकाश आंबेडकर यांनी घेतलेली भूमिका लोकशाही, संविधान आणि खुद्द डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या विरोधी आहे. त्यांची भूमिका भाजपला अनुकूल ठरणारी आहे, अशी टीका काँग्रेस नेते व माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी केली. प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेमुळं बौद्ध समाजात तीव्र नाराजी आहे,' असा दावाही मुणगेकर यांनी केला. मुंबईतील गांधी भवन इथं झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मुणगेकर यांनी यावेळी प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेमधील विसंगती वेगवेगळी उदाहरणं देऊन दाखवून दिली.