Udayanraje Vs Shivendraraje: सातारा नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यात राजकारण तापलं आहे. खासदार उदयनराजे व आमदार शिवेंद्रराजे यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. उदयनराजे यांच्या नेतृत्वाखालील आघाडीच्या काळात नगरपालिकेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला आहे. सातारकर या आघाडीचा कडेलोट करतील, असा दावा शिवेंद्रराजे यांनी केला आहे.