New Parliament building first look Video : सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पांतर्गत राजधानी दिल्लीत देशाच्या संसद भवनाची नवी इमारत उभी राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या संसद भवनाचं उद्घाटन २८ मे २०२३ रोजी होणार आहे. संसदेची नवी इमारत अत्यंत भव्य असून जुन्या इमारतीपेक्षा अधिक क्षमता असलेली आहे. नव्या संसदेसाठी ९०० कोटी रुपये खर्च करण्यात आला असून एकूण ६४,५०० चौरस मीटर क्षेत्रावर ही इमारत उभी राहिली आहे. या इमारतीचा फर्स्ट लूक समोर आला आहे. संसद भवनाची भव्यता डोळ्यांचं पारणं फेडणारी आहे.