Nilesh Lanke Speech : अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार नीलेश लंके यांची आज राहुरी इथं प्रचारसभा झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार हे यावेळी उपस्थित होते. शरद पवार यांच्या उपस्थितीत नीलेश लंके यांनी यावेळी जोरदार भाषण केलं. ग्रामपंचायत सदस्यापासून अवघ्या काही वर्षांत आमदारकी पर्यंत आलोय. आता खासदार होणार आहे. इथपर्यंत असाच आलेलो नाही. सगळी गुंडगिरी उकळून पेलोय, असा इशारा नीलेश लंके यांनी प्रतिस्पर्ध्यांना दिला. मला अडकवण्याचा प्रयत्न सुरू आहे. १३ तारखेपर्यंत अटकही होऊ शकते, असंही ते यावेळी म्हणाले.