मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video : मला हुंडा घ्यायचा असता तर गुवाहाटीला गेलो असतो; उत्तम जानकर काय म्हणाले?

Video : मला हुंडा घ्यायचा असता तर गुवाहाटीला गेलो असतो; उत्तम जानकर काय म्हणाले?

Apr 26, 2024 07:28 PM IST Ganesh Pandurang Kadam
Apr 26, 2024 07:28 PM IST

Uttam Jankar Speech : माढा लोकसभा मतदारसंघातील जाहीर प्रचारसभेत उत्तम जानकर यांनी जोरदार फटकेबाजी केली. भाजपनं सत्तेच्या माध्यमातून राजकारण करून आमचं नेतृत्व संपवण्याचा प्रयत्न केला. आम्हाला भविष्यातही काही मिळालं नसतं. त्यामुळंच मोहिते-पाटील आणि आम्ही मतभेद बाजूला ठेवून एकत्र येण्याचा निर्णय घेतला, असं जानकर म्हणाले. शरद पवार साहेबांसोबत असताना अजित पवारांचा रुबाब आणि दादागिरी वेगळीच असायची, आज त्यांची पंचाईत झाली आहे. पवार साहेब एकाकी लढतायत. किमान एक निवडणूक तरी त्यांना साथ द्या, असं कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं. सगळी दारं आम्हाला उघडी होती. सगळी दारं उघडी होती. पण आम्ही एकमेकाला शब्द दिला होता आणि तो पाळला. म्हणून विमानातून उडी टाकून मी पवार साहेबांच्या छकड्यात बसलो, असं उत्तम जानकर म्हणाले.

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp