Yugendra Pawar Speech Video : बारामती येथील कन्हेरी गावात आज महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा झाली. शरद पवारांचे नातू युगेंद्र पवार यांनी पहिल्यांदाच सर्वांसमोर जाहीर भाषण केलं. सुप्रिया सुळे यांच्या कामाची त्यांनी तोंडभरून स्तुती केली. सुप्रिया सुळे यांच्या कामाची देशभरात चर्चा असते. आपल्याला दिल्लीत कसा खासदार पाहिजे हे ठरवण्याची वेळ आली आहे. नुसता दिल्लीत जाऊन बसणारा आणि सांगेल तेवढंच करणारा पाहिजे की तुमच्या प्रश्नांवर आवाज उठवणारा खासदार पाहिजे याचा विचार व्हायला हवा, असं युगेंद्र पवार म्हणाले.