Rahul Gandhi Speech : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अमरावती दौऱ्यावर असलेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज जोरदार भाषण केलं. काँग्रेसच्या वतीनं त्यांनी जनतेला पाच महत्त्वाची आश्वासनं दिली. काँग्रेसचं सरकार आल्यास गरिबांच्या खात्यात वर्षाला १ लाख रुपये टाकले जातील, असा शब्द त्यांनी दिला. कर्नाटकमध्ये गृहलक्ष्मी या योजनेच्या अंतर्गत आताच एक कोटींहून अधिक गरीब महिलांच्या खात्यात दरमहा २ हजार रुपये दिले जातात, याकडंही त्यांनी लक्ष वेधलं. यावेळी त्यांनी बँकेत येणाऱ्या पैशांसाठी ठकाठक, ठकाठक, ठकाठक असा शब्द वापरला. त्याला उपस्थितांनी जोरदार प्रतिसाद दिला.