मराठमोळा अभिनेता स्वप्नील जोशी सध्या चर्चेत आहे. त्याचे दोन नवेकोरे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या चित्रपटांच्या प्रदर्शनापूर्वी स्वप्नील देवदर्शन करताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी तो अयोध्येला गेला होता. त्यानंतर आता तो कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या दर्शनासाठी गेला आहे.