बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री मलायका अरोराचा एक व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये ती एअरपोर्टवर चालताना दिसत आहे. त्यावेळी तिच्यासोबत बॉडीगार्डदेखील नव्हते. त्यामुळे अनेकजण फोटो काढण्यासाठी मलायकाजवळ येत होते. मात्र मलायकाचे वागणे पाहून अनेकांनी तिला चांगलेच सुनावले आहे.