मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Nilkrishna Gajare Video : जेईई टॉपर नीलकृष्ण गजरे यानं अभ्यास कसा केला? आवर्जून ऐका!

Nilkrishna Gajare Video : जेईई टॉपर नीलकृष्ण गजरे यानं अभ्यास कसा केला? आवर्जून ऐका!

Apr 26, 2024 12:48 PM IST Ganesh Pandurang Kadam
Apr 26, 2024 12:48 PM IST

Nilkrishna Gajare Video : जेईई मेन २०२४ या परीक्षेत महाराष्ट्राच्या वाशिम जिल्ह्यातील नीलकृष्ण गजरे या विद्यार्थ्यानं पहिला क्रमांक पटकावला आहे. एएनआयशी बोलताना त्यानं आपला अनुभव सांगितला आहे. 'मी एक ध्येय निश्चित केलं होतं, ते साध्य केल्यानंतर आता खूप बरं वाटतंय. माझे वडील शेतकरी आहेत. मी अकरावीत असतानाच नागपुरात जेईईची तयारी सुरू केली होती. एक चांगला इंजिनीअर होऊन देशाची सेवा करणं हे माझं पुढचं ध्येय आहे. अनेक विद्यार्थी सोशल मीडियाचा जास्त वापर करत आहेत. मनोरंजनाची गरज आहेच, पण त्यावर नियंत्रण असणं गरजेचं आहे. मी आठवड्यातून एखादा सिनेमा मोबाइलवर पाहायचो. इतर वेळी मोबाइलपासून दूर राहायचो, असं त्यानं सांगितलं.

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp