Madha Rally Speech Video : माढा लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांनी आज विरोधकांवर निशाणा साधला. शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या सभेत ते बोलत होते. सांगोला, माळशिरस या सगळ्याच तालुक्यांतून मला लोकसभा लढण्याची विनंती झाली होती. ती मान्य केली. आता विरोधक गडबडून गेलेत. टीव्हीवर काहीही बोलत आहेत. पण घाबरून जायची गरज नाही. मागच्या वेळेला घाणीवर फुलं टाकून आपण लावलेला ढीग यावेळी साफ करून टाकायचा आहे. मोहिते-पाटील, देशमुख आणि पवार कुटुंब हा फेविकॉलचा मजबूत जोड आहे, तुटणार नाही, असा इशाराही त्यांनी विरोधकांना दिला.