Varun Dhawan Birthday: बॉलिवूडचा ‘स्टुडंट ऑफ द इयर’ म्हणजेच अभिनेता वरुण धवन आज त्याचा ३७वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने जगभरातील चाहते वरूण धवनला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. दरम्यान, पापाराजी देखील केक घेऊन वरुण धवनच्या घरी पोहोचले होते. यावेळी वरूणने सगळ्या पापाराजींसोबत केक कापून आपला वाढदिवस साजरा केला. तर, यावेळी त्याला भेटायला आलेल्या चाहत्यांसोबत देखील त्यांनी फोटो काढले.