बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन यांना बुधवारी लता दीनानाथ मंगेशकर पुरस्काराने गौरवण्यात आले. गानकोकिळा लता मंगेशकर यांचे २०२२मध्ये निधन झाले. त्यांच्या स्मरणार्थ कुटुंबीयांनी आणि ट्रस्टने या पुरस्काराची सुरुवात केली. काही दिवसांपूर्वीच अमिताभ बच्चन यांना लता दीनानाथ मंगेशकर हा पुरस्कार मिळणार असल्याची चर्चा सुरु होती. त्यांच्याशिवाय संगीत दिग्दर्शक एआर रहमान आणि अभिनेता रणदीप हुड्डा यांना देखील या विशेष पुरस्काराने गौरवण्यात आले.