मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video : शरद पवार यांच्या भाषणावर टाळ्यांचा कडकडाट; शिवसेनेबद्दल असं काय बोलले?

Video : शरद पवार यांच्या भाषणावर टाळ्यांचा कडकडाट; शिवसेनेबद्दल असं काय बोलले?

Apr 23, 2024 10:56 AM IST Ganesh Pandurang Kadam
Apr 23, 2024 10:56 AM IST

Sharad Pawar Speech in Amravati Video : अमरावती लोकसभा निवडणुकीचे महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांच्या प्रचारासाठी शरद पवार यांनी सभा घेतली. यावेळी भाषण करताना शरद पवार यांनी जुन्या आठवणी सांगून शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे, शिवसेना आणि शिवसैनिकांचं तोंडभरून कौतुक केलं. शिवसैनिक हा लोकांच्या मदतीसाठी धावून जाणारा असतो. देशाच्या समोर जेव्हा-जेव्हा संकट येतं, तेव्हा शिवसेनेचं नेतृत्व आधी देशाचा विचार करतं. १९७७ साली संपूर्ण देश इंदिरा गांधी यांच्याविरोधात असताना फक्त बाळासाहेब त्यांच्या बाजूनं उभे ठाकले. आजही देशात वेगळी परिस्थिती असताना आम्ही शिवसेनेसोबत आहोत याचा आनंद आहे, असं शरद पवार म्हणाले.

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp