Actress Aditi Sarangdhar: अभिनेत्री अदिती सारंगधर हिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन पुण्यात प्रायव्हेट कॅबने फिरतानाचा एक अनुभव शेअर केला आहे. तिने गाडीतूनच ड्रायव्हर बरोबरच्या संभाषणाचा व्हिडीओ शेअर केला आहे. अभिनेत्रीने पुण्यातील प्रवासादरम्यानचा एक अनुभव शेअर केला आहे. ‘एसी चालू करणार आहेस की नाही? आम्हाला खूप गरम होतंय’, असं अभिनेत्री त्या ड्रायव्हरला विनवणी करून सांगताना दिसत आहे. यावर काचा बंद केल्यावरच एसी लावेन, असं उत्तर डायव्हर अभिनेत्रीला देतो. यानंतर त्या दोघांमध्ये बाचाबाची होताना दिसते.