Shiv Thakare-Abdu Rozik: ‘बिग बॉस १६’ हा शो संपला असला, तरी अद्यापही याची चर्चा कमी झालेली नाही. या शोमधील स्पर्धकांच्या हाणामारी व्यतिरिक्त आणखी एक गोष्ट प्रेक्षकांच्या लक्षात राहिली ती म्हणजे या शो मधील ‘मंडली गँग’. या मंडली गँगचे दोन लोकप्रिय मेंबर म्हणजे अब्दू रोजिक आणि शिव ठाकरे. ‘बिग बॉस १६’ संपल्यानंतर देखील ही जोडी अनेक कार्यक्रमांना एकत्र हजेरी लावत असते. नुकत्याच एका पार्टी दरम्यान या दोघांचा ‘ब्रो’मान्स पाहायला मिळाला.