मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Sharath Kamal: टेबल टेनिसमध्ये शरथ कमल अजिंक्य! पटकावलं स्पर्धेतलं दुसरं सुवर्णपदक

Sharath Kamal: टेबल टेनिसमध्ये शरथ कमल अजिंक्य! पटकावलं स्पर्धेतलं दुसरं सुवर्णपदक

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Aug 08, 2022 06:08 PM IST

Sharath Kamal: भारताचा अनुभवी खेळाडू अचंत शरथ कमलने टेबल टेनिसच्या पुरुष एकेरीची अंतिम फेरी जिंकली आहे. अंतिम फेरीत शरथने इंग्लंडच्या लियाम पिचफोर्डचा पराभव केला. सध्याच्या खेळांमधील अचंत शरथ कमलचे हे दुसरे सुवर्णपदक आहे.

Sharath Kamal
Sharath Kamal

Commonwealth Games 2022: अचंता शरथ कमलने पुरुष एकेरीत सुवर्णपदक पटकावले आहे. अंतिम फेरीत शरथ कमलने इंग्लंडच्या लियाम पिचफोर्डचा ११-१३, ११-७, ११-२, ११-६, ११-८ असा पराभव केला. 

सामन्यात लियाम पिचफोर्डने पहिला गेम शरथ कमलविरुद्ध १३-११ असा जिंकला. त्यानंतर शरथ कमलने दुसरा गेम ११-७ असा जिंकून सामन्यात बरोबरी साधली.

त्यानंतर शरथने तिसरा गेम ११-२ अशा फरकाने जिंकून सामन्यात २-१ अशी आघाडी घेत सामना खिशात घातला.

दरम्यान, शरथ संपूर्ण या स्पर्धेत अजिंक्य राहिला आहे. राऊंड ऑफ ३२ मध्ये त्याने ऑस्ट्रेलियाच्या फिन लूचा ४-० असा पराभव केला. त्याचवेळी, १६ च्या फेरीत शरथ कमलने नायजेरियाच्या ओलाजिदे ओमोटोयोवर ४-२ असा विजय मिळवला. उपांत्यपूर्व फेरीत शरथने सिंगापूरच्या इसाक क्वेक योंगचा ४-० असा पराभव केला होता. त्याचवेळी, उपांत्य फेरीत त्याने इंग्लंडच्या पॉल ड्रिंकहलचा ४-२ असा पराभव केला.

विशेष म्हणजे, कॉमनवेल्थ गेम्स २०२२ या स्पर्धेतील शरथ कमलचे हे दुसरे सुवर्णपदक होते. तसेच एकेरीमध्ये दुसऱ्यांदा अचंतेने राष्ट्रकुलमध्ये सुवर्णपदक पटकावले आहे.

शरथ आणि श्रीजा अकुला जोडीला मिश्र दुहेरीत सुवर्ण-

याशिवाय अचंत शरथ कमलने टेबल टेनिसमध्ये मिश्र दुहेरीचे विजेतेपदही पटकावले आहे. शरथ आणि श्रीजा अकुला या जोडीने अंतिम फेरीत मलेशियाच्या जावेन चुंग आणि कॅरेन लेन यांचा ११-४, ९-११, ११-५, ११-६ असा पराभव केला.

WhatsApp channel