मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराहची शस्त्रक्रिया यशस्वी; पण ६ महिने मैदानापासून राहावा लागेल दूर

Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराहची शस्त्रक्रिया यशस्वी; पण ६ महिने मैदानापासून राहावा लागेल दूर

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Mar 08, 2023 11:07 AM IST

Jasprit Bumrah Surgery Updates: भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहवर न्यूझीलंडमध्ये करण्यात आलेली शस्त्रक्रिया यशस्वी ठरली आहे.

Jasprit Bumrah
Jasprit Bumrah

Jasprit Bumrah Undergoes Back Surgery: भारतीय क्रिकेट संघाचा आघाडीचा गोलंदाज जसप्रीत बुमराह गेल्या अनेक दिवसांपासून संघाबाहेर आहे. आशिया कप, टी 20 वर्ल्ड कप, बॉर्डर गावस्कर ट्रॉफी आणि आता आयपीएल मधून देखील बुमराह दुखापतीच्या कारणास्थव बाहेर पडला आहे. आगामी एकदिवसीय विश्वचषक 2023च्या पार्श्वभूमीवर बुमराहच्या पाठीवर न्यूझीलंडमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली. ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली, पण त्याला पुढील ६ महिने मैदानापासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. यामुळे जसप्रीत बुमराह आगामी आयपीएल खेळणार नसून मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांमध्ये निराशा पसरली आहे.

न्यूझीलंडमधील प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, जसप्रीत बुमराहवर करण्यात आलेली शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, त्याच्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यासाठी रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी नकार दिला आहे. यासंदर्भात भारतीय नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआय माहिती देईल, असे रुग्णालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

जसप्रीत बुमराह गेल्या अनेक महिन्यांपासून पाठीच्या दुखापतीने त्रस्त होता. या दुखापतीमुळे जसप्रीत बुमराहला आशिया चषक २०२२ आणि टी-२० विश्वचषकातून बाहेर पडावे लागले होते. या वर्षाच्या सुरुवातीपासूनच जसप्रीत बुमराह भारतीय संघाचा भाग नाही.

भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणारा एकदिवसीय विश्वचषक डोळ्यासमोर ठेवून जसप्रीत बुमराहचे संघात परतणे भारतीय संघासाठी अतिशय महत्त्वाचे आहे. ऑस्ट्रेलियात पार पडलेल्या टी-२० विश्वचषकात भारताला जसप्रीत बुमराहची कमतरता जाणवली. आगामी एकदिवसीय विश्वचषकाच्या तोंडावर जसप्रीत बुमराह मैदानात लवकरात लवकर मैदानात परतावा, यासाठी ही शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

WhatsApp channel

विभाग